येथील एमबीबीएस पात्र विद्यार्थ्यांचा पैशा अभावी प्रवेश हुकण्याची माहिती उपलब्ध होताच श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी त्या गरीब विद्यार्थ्यास संस्थेतर्फे एक लाख रुपयाची भरीव मदत संस्थेचे सचिव माजी आमदार गुरुनाथराव कुरुडे यांच्याहस्ते एक लाख रुपये विद्यार्थ्यास रोख देण्यात आले.
लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर हा लोहा येथील गरीब होतकरू विद्यार्थी आहे.लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने त्याच्या आईने शिवणकाम करून त्याला शिकविले.एमबीबीएस शिक्षणाला एक गुण कमी पडल्याने लक्ष्मीकांतचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऐवजी प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागला.प्रायव्हेट फिसची भरने त्याला शक्य नव्हती.फिस अभावी त्याला एमबीबीएसच्या शिक्षणा पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता होती.
यावेळी विद्यार्थी लक्ष्मीकांत कहाळेकर,त्याची आई स्वाती कहाळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पाटील पेठकर,प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ.गिरमाजी पगडे,शिवाजी मुंडे, मलकुअप्पा शेट्टे,मुख्याध्यापक दिलीप बोधगिरे, मुख्याध्यापक संभाजी उंद्रटवाड, मुख्याध्यापक हरिहर चिवडे,उपमुख्याध्यापक आढाव, प्रा.पांडुरंग पांचाळ, प्रा.उमेश पुजारी,प्रा.प्रदीप गरूडकर,प्रा.सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.