ग्रामिण रुग्णालय कंधार येथे ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन; वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग नांदेड अंतर्गत
कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात ताण-तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर श्री.गुरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय, नांदेड च्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर ग्रामीण रुग्णालय कंधार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा “मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रम” याच्या सौजन्याने सर्व जनतेस कळविण्यात येते की दि:-21/ 02/2023 रोजी ठिक सकाळी 10 ते दुपारी 2 वा पर्यंत आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयासाजे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी कंधार तालुक्यातील जनतेला केले आहे.

!! नको दुरावा द्या आधार बरे होतील मानसिक आजार !!

!!चला बोलूया नैराश्य टाळूया !!

*ताण- तणाव निवारण शिबिर*
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे*

“ताण तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर*”याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या शिबिरात खालील मानसिक समस्या व आजारावर उपचार केले जातील

*चिंता, नैराश्य, झोप न येणे, व्यसनाधीनता, जुनाट डोकेदुखी, झटके येणे, करणी,भानामती, स्किझोफ्रेनिया, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अकारण बडबड, मतिमंदत्व, विस्मरण,लहान मुलांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले मानसिक ताण- तणाव*, तसेच अनेक
मानसिक आजार व समस्येवर नांदेड येथील मानसोपचार तज्ञांमार्फत मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जातील.

तरी संबंधित समस्या व आजार असलेल्या आपल्या जवळील नातेवाईक, मित्र तसेच गावातील सर्व लोकांना शिबिराबाबत माहिती देऊन सहकार्य करावे.या ताण-तणाव व डॉ.मानसोपचार तज्ञ डॉ.शाहू शिराढोणकर यांची उपस्थिती राहणार आहे .तरी सुजाण नागरिकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा.

संपर्क व नाव नोंदणी :-
श्रीमती.आऊबाई भुरके +919860476066
श्री.अरविंद वाठोरे+918793678274

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *