लोहा तालुक्यातील मौजे हातनी येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या महावितरण वीज कंपनीचे 33/11 के व्ही उपकेंद्र कामाची अंदाजित किंमत 2 कोटी 85 लाख रुपये कामाचे थाटात भूमिपूजन काल गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,खरेदी विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय पाटील ढेपे,जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, भास्करराव पाटील जोमेगावकर, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर, महावितरण कार्यकारी अभियंता आर पी चव्हाण,उप कार्यकारी अभियंता सचिन दवंडे, शाखा अभियंता गुरुप्रसाद देसाई, राजू पाटील कापसीकर, हातनीचे सरपंच गंगाबाई कदम, माजी सरपंच सुनील भदरगे, सरपंच आदिनाथ पाटील जोमेगावकर,सरपंच गोपीराज हंबर्डे, सरपंच पंजाब माळेगावे,गोविंदराव पा जाधव,पंडित पाटील मेथे, उपसरपंच हनुमंत पाटील डोणवाडेकर प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की,
लोहा कंधार मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर केलेली असून एकट्या उमरा सर्कलमध्ये 500 कोटी रुपयांची सिंचनाची कामे मंजूर मार्गी लागलेली आहेत वाका व डोलारा येथे पुलकम बंधारा यासह अन्नधान्य साठवून गोदाम असा कोटीवर रुपयाचा विकास विविध विकास कामांचा निधी उमरा सर्कल मध्ये मंजूर झालेला असून कामांची सुरुवातही झालेली आहे आगामी काळात मतदारसंघातील विकासाचा वेग अधिक वाढण्यासाठी मारतळा येथे एमआयडीसीची उभारणी लवकरच करण्यात येईल असे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले.
हातनी येथे 33 के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन झाल्यामुळे हे वीज उपकेंद्र दर्जेदार व अत्याधुनिक पद्धतीने बांधले जाणार असल्याने या वीज उपकेंद्रामुळे या भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना विजेच्या तुटवड्याचे संकट कायमचे दूर होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांनी आपल्या भाषणातून आमदार शिंदे यांच्या मतदारसंघातील विकासाभिमुख कार्याचा आढावा सांगितला
यावेळी सरपंच पंजाब माळेगावे, सरपंच विजय पाटील जाधव,गणेश पाटील हंबर्डे, नामदेव पाटील कदम, दिगंबर पाटील कदम, सुरेश पाटील ढगे,विठ्ठल हातने, उपसरपंच संभाजी वने,सचिन कुदळकर,प्रदीप नंदनवनकर,ओम राजे शिंदे,रामेश्वर लोहकरे,सचिन लोहकरे,कचरू बंडेवाड,अंकुश वाघमारे सह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते