रमाई गॅस सर्व्हिस कंधार अंतर्गत आलेगाव येथे प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रम व सुरक्षा शिबिर

 

कंधार ; प्रतिनिधी

प्रधानमंत्री एलपीजी पंचायत कार्यक्रम व सुरक्षा शिबिर (सेफ्टी क्लिनिक) मौजे आलेगाव तालुका कंधार येथे रमाई गॅस सर्व्हिस कंधारच्या अंतर्गत आराध्या सेवा केंद्र CSC रिफील पॉईंट आलेगाव यांच्या सौजन्याने घेण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कपाळे सुदर्शन (ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय आलेगाव) तर
प्रमुख उपस्थिती म्हणून वसंत पा . मोरे ( पोलीस पाटील आलेगाव),
अंजनाबाई किशन आंबटवाड( ग्रां. पं. का. आलेगाव माजी सरपंच)
, मोहन सर्जेराव मोरे ( ग्रा. पं . सदस्य)
,प्रकाश गोविंद मोरे ( ग्रा. पं . सदस्य )
,मारोती धोंडिबा वर्ताळे ( ग्रा. पं . सदस्य ) सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बळी मोरे
, सज्जनराव दिगंबरराव मोरे माझी माजी तंटामुक्ती अध्यक्ष.
,दादाराव चंपतराव मोरे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष.
, माधवराव रामराव मोरे शालेय शिक्षण समिती सदस्य,
गुलाब नामदेव मोरे शालेय शिक्षण समिती सदस्य, कृषीनिष्ट पुरस्कार प्राप्त प्रशांत शंकरराव मोरे आदीची यावेळी उपस्थिती होती .

रमाई गॅस सर्व्हिस कंधारचे मॅनेजर गायकवाड टि. के. यांनी उपस्थित महिलांना एलपीजी पंचायत,सेफ्टी क्लिनिक आणि एलपीजीसी संबंधित इतर योजनांची सविस्तर माहिती दिली , तसेच एलपीजीचे महत्त्व पटवून देत असताना पारंपारिक इंधनाचा म्हणजेच चुलीचा वापर केल्यामुळे स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीसाठी व मुलांसाठी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात या प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यामध्ये निमोनिया, क्षयरोग, मोतीबिंदू, हृदयविकार, फुप्फुसाचे जुनाट आजार इत्यादी होऊ शकतात म्हणून स्वच्छ इंधन म्हणून एलपीजी गॅसचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.

गॅस एजन्सी चे कॉम्प्युटर ऑपरेटर सुदर्शन गजभारे मार्गदर्शन करताना म्हणाले गॅस हा स्फोटक व जलद गतीने पेटणारा ज्वलनशील पदार्थ आहे सिलेंडर नेहमी सरळ उभा ठेवावा व त्याचबरोबर शेगडी सिलेंडरपेक्षा कमीत कमी सहा इंच उंचावर किचन ओट्यावर ठेवावे, एका सिलेंडर मधून दोन कनेक्शन म्हणजे T कनेक्शन करू नये, सुरक्षा पाईपचा वापर करावा स्वयंपाक करत असताना शेगडी जवळ उपस्थित रहावे आणि स्वयंपाक करणे झाल्यावर अथवा रोज रात्री रेग्युलेटर बटन बंद करावे असे सांगितले .

यावेळी ग्रामीण भागातील महिलांना एलपीजी गॅस मुळे उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीत बचाव एलपीजीचा वापर आणि गॅस सिलेंडर, स्टोव्ह व रेग्युलेटरची देखभाल व इतर सुरक्षिततेच्या बाबतीत माहिती देण्यात आली.

 

या कार्यक्रमामध्ये उज्वला गॅस कनेक्शन धारकांनी प्रचंड प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आराध्या सेवा केंद्र uh CSC रिफील पॉईंटचे VLE श्री नागेश नामदेव मोरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *