राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका श्रीमती प्रेमलाताई नरंगले ( बामणे ) सेवानिवृत

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका, नांदेड पतपेढीच्या माजी संचालिका पंचाली पतसंस्थेच्या संचालिका श्रीमती प्रेमलाताई नरंगले ( बामणे) ह्या 40 वर्ष शैक्षणिक क्षेत्रातील आपली सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद हायस्कूल लोहा यांच्यावतीने सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता

 

या कार्यक्रमासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब,माजी आमदार रोहिदास चव्हाण साहेब , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री हरीहररावजी भोसीकर साहेब,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ . प्रणिता ताई देवरे माजी शिक्षण संचालक श्री गोविंद नांदेड साहेब, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कपाळे साहेब, उपसभापती नरेंद्र गायकवाड, उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ वाले, मनोहर पाटील भोसीकर , वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्षा निरंजन ताई आवटे, जिल्हाध्यक्ष दैवशालाताई पांचाळ, गटशिक्षणाधिकारी व्यवहारे साहेब , युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया हाके, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, महिला आघाडीच्या तालूका अध्यक्ष साधनाताई एगंडे , सूनंदाताई भोसीकर, तसेच अनेक पदाधिकारी ,शिक्षक संघटनेचे नेते,पाहुणेमंडळी व गावकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *