सावरकरांचे क्रांतिकारी विचार सदैव प्रेरणा देणारे -प्रणिता देवरे चिखलीकर

 

आज कंधार येथून स्वातंत्र्यवीर गौरव यात्रेस आरंभ.

 

कंधार : (दिगांबर वाघमारे)

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देत ज्यांनी दोन वेळेस काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये आपल्या आपले आयुष्य खर्ची घातले असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचा गौरव करणारी गौरव यात्रा लोहा कंधार विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जाणार आणि त्याचे स्वागत केले जाणार सावरकरांचे विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचले सावरकरांच्या विचारातुन देशभक्ती येणाऱ्या पिढीमध्ये भिनली जाईल असे प्रतिपादन दिनांक एक एप्रिल रोजी गौरव यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे -चिखलीकर यांनी कंधार येथे केले

भारतीय जनता पार्टी कंधार आयोजित स्वतंत्रवीर गौरव यात्रा १ एप्रिल ते ६ एप्रिल पर्यंत कंधार लोहा तालुक्यातील गावांत स्वातंत्रवीर गौरव यात्रा जाणार आहे नांदेड भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.श्री. व्यंकटराव पा.गोजेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.भाजपा जिल्हा सरचिटणीस व कंधार लोहा विधानसभेत स्वातंत्र्यवीर गौरव यात्रा प्रमुख प्रवीण पा.चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सदरील यात्रा पार पडणार आहे.

 

 

सावरकर सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते.
-गोजेगावकर

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वतंत्र सेनानी प्रेरणा देण्याचे ऊर्जा देण्याचे कार्य हे सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातून स्वातंत्र्य सैनिकांनी घेतले व देशाच्या स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडा स्वतःहून समर्पण केले सशस्त्र क्रांतिकारकांचे ते प्रेरणास्थान होते ते प्रखर देशभक्त होते दृष्टी होते अशा स्वातंत्र्यवीरांचा गौरव करणारी ही गौरव यात्रा आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोरेगावकर यांनी केले.

 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अड मारुती पंढरे, बोलताना म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे परखड विचार भारतीय स्वातंत्र्यामध्ये ऊर्जा स्त्रोत होते ते हिंदुत्वधाचे पुरस्कर्ते होते ते पुरोगामी सुद्धा होते त्यांनी भाषा शुद्धीसाठी आपले विचार त्यांनी ठेवले एवढेच नाही तर वस्तुनिष्ठ हिंदुत्ववाद त्यांनी जगासमोर ठेवला नुसता हिंदूच नाहीतर देश हितासाठी काम करणारा हिंदू त्यांनी निर्माण झाला पाहिजे यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले सावरकरांची गौरव यात्रा म्हणजे हिंदुत्वाच्या विचाराची गौरव यात्रा असेच यावेळी म्हणाले.

प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदरील यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची माहिती,त्यांनी केलेला त्याग,सेवा,समर्पण तसेच सावरकरांनी देश स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा व त्यांच्या कार्याचा यात्रेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. समवेत भाजपा जिल्हा सरचिटणीस गंगाधरजी जोशी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्राताई गोरे,जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पा.माळेगावे,युवा मोर्चा जिल्हासरचिटणीस रोहित पाटील, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मारोती पंढरे,कंधार भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पा.शिंदे, कंधार शिवसेना तालुकाप्रमुख धनराज लुंगारे, शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, सरचिटणीस विनोद तोरणे ,चेतन केंद्रे,मधुकर डांगे, राजहंस शहापूरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे, महिलामोर्चा सरचिटणीस कल्पना गीते, स्मिताताई बडवणे माजी नगरसेवक मीनाताई मुखेडकर,आसिफ शेख, अड सागर डोंगरजकर, युवा सेना शहराध्यक्ष श्रेयस लाठकर, रजत शहापूर,बालाजी तोरणे,बालाजी तोटावाड ,व्यंकट नागलवाड, व्यंकट मामडे याच्यासह भाजपा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांनी स्वतंत्र्यवीर गौरव यात्रेच्या रथास घोडजकडे मार्गस्थ केले. याप्रसंगी प्रस्ताविक तालुका अध्यक्ष भगवान राठोड यांनी केले तर संचलन अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी केली

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *