नांदेड ; प्रतिनिधी
जागतिक आरोग्य दिन व होमिओपॅथिक चे जनक DR.Samuel Hahnemann(डॉ_सॅम्युअल हानेमन) यांच्या जन्मदिनानिमित्त आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या अंतर्गत ARHM (आरोग्य रक्षक हेल्थ मिशन) चे पहिले अधिवेशन संपन्न झाले .
या अधिवेशनात ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्हा , तालुका व शहर संपर्कप्रमुखाची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संतोष जटाळे व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राम पावडे , डॉ.दिनेश सूर्यवंशी, डॉ.कुलकर्णी सर, व बाळासाहेब पवार यांची उपस्थित होती .
ही केंद्रशासित संकल्पना निर्माण करणारे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष डॉ संतोष जटाळे यांच्या अध्यक्षतेनुसार प्रत्येक जिल्हा व तालुकाध्यक्ष ची निवड करण्यात आली.
त्यात ARHM च्या कंधार तालुका अध्यक्षपदी डॉ तक्षशिला बाळासाहेब पवार
(पवार हॉस्पीटल शिवजी चौक कंधार) यांची
निवड करण्यात आली.