महाराष्ट्र दिनी आयोजित राज्य गीत गायन उपक्रम आता १५ ऑगस्ट रोजी

 

नांदेड ; प्रतिनिधी

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष निमित्त नांदेड जिल्हयातील सर्व माध्यामाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळामधील सर्व विद्यार्थी आपल्या शाळेत एकाच वेळी १ मे २०२३ रोजी गर्जा महाराष्ट्र माझा राज्यगीताचे सामुदायिक गायन करणार होते. परंतु सध्या राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होवुन उष्ण्तेची अधिक सांभावना व्यक्त केली आहे. या अनुषंगाने शासनाने २१.०४.२०२३ पासुन शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहिर केली आहे.

उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन सुरक्षेच्या दृष्टीने सद्यस्थितीत शाळेत विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. प्रशासनाने १ मे रोजी होणारा सामुदायिक राज्यगीत गायन हा उपक्रम तुर्तास स्थगित केला आहे. सदरील उपक्रम हा १५ ऑगस्ट२०२३ ला स्वातंत्र्य दिनी राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाचे नियोजन सर्वांना कळविण्यात येईल.

१ मे २०२३ रोजी राज्यगीत उपक्रम तुर्तास स्थगीत केल्याची नोंद सर्व संबंधीत प्राचार्य,मुख्यााध्याक, शिक्षक इत्यादी संबंधीत यंत्रणेने घ्यावी, असे आवाहन जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *