…. सकाळी टेकडी चढताना आणि उतरताना ऐकलेले डायलॉग.. अरे यार आज पाणीच आले नाही..
दुसरा म्हणतोय ,,आमच्याकडे ३ वाजता पाणी आले पण कोणीतरी नळ सुरु ठेवला सगळं पाणी वाहुन गेलं..
तिसरा म्हणतोय आज मी टाकी स्वच्छ करणार होतो.. तेच ते शीळं पाणी बदलणार होतो पण गेल्या आठवाड्यापासून पाण्याची बोंब आहे..
आता उभे रहात असलेले टॉवर अशा किती morning waterless करणार आहेत काय माहीत.. पाणी हेच जीवन मग काही वर्षाने तेच मिळाले नाही तर ?? असा प्रश्न सहज मनात आला आणि सकाळी सकाळी घाम फुटला..
राजकारण सुरुच राहणार , पैसेवाले पैसे खात राहणार..काम चुकारु तसेच वागणार , मग आपण काय करु शकतो?? .. एक दोन गोष्टी नक्कीच करु शकतो आणि तेही आपल्यासाठी कारण आपले कर्म आपल्याला तारणार आहे बाकी कोणीही नाही..
पाणी कधी शिळे होत नाही त्यामुळे पाणी ओतु नका..
आपल्या हातुन नळ सुरु राहणार नाही . काळजी घेउयात
कुठेही सुरु असलेला नळ बंद करुयात. एका रुममधे बसलेले असताना उरलेल्या रूमचे लाइट बंद ठेवुयात..
कारण लाईट , पाणी ही आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही याची जाण ठेवुयात..
इतक्या गोष्टी आपण प्रत्येकजण नक्कीच करु शकतो.. शेजारीण भरपुर पाणी वापरते म्हणुन मी पाणी वाया घालवणे
हे चुकीचे आहे..
आपली रोजची सकाळ ही डोळ्यात पाणी आणणारी नसावी असं वाटत असेल तर आपल्याला आपली मानसिकता आणि विचारसरणी बदलण्याची गरज आहे…
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री