कंधार ;
दि.१ मे २००७ रोजी भल्या पहाटे गनीमी कावा वापरुन महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून लोहा मोड वरील छ.शिवप्रभुंचा पुतळा दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी आश्वारुढ पुतळा बसविला.तो पुतळा गनीमी कावा वापरुन बसविला. त्या पुतळ्यास शिवभक्त माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब व त्यांच्या सहकार्यांनी पाठिंबा दिला.हा पाठिंबा ऋणानुबंध नात्यात दृढ होवून सौ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे यांचा थाटामाटात विवाह सोहळा लोहा नगरीत गोरज मुहूर्तावर १५ वर्षापूर्वी संपन्न झाला.मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठाण कंधारचे सचिव व छ.शंभुराजे इंग्लिश स्कूल वीर नागोजी नाईक चौक कंधार हे ज्ञानालय नावारुपास आनणारे आणि श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटीचे सन्माननिय अध्यक्ष,माजी जि.प.सदस्य भाई डाॅ.प्रा.पुरुषोत्तमजी धोंडगे व त्यांच्या अधिश्वरी सौ.मनिषा पुरुषोत्तमजी धोंडगे या उभयतांच्या विवाहास दि.३० एप्रिल २०२४ रोजी एक १५ वर्ष पुर्ण झाली.त्यांच्या वैवाहिक जीवनरंभी क्षण वाढदिवसाच्या मनापासुन विक्रमादित्य हर्षित राजनंदनीमय राजेशाही सौभाग्य सदिच्छा व मानाची कोटि-कोटि जयक्रांति!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार