….. ते रील काय असतय ??..
काही महिन्यापुर्वी मला कोणीतरी विचारलं ,,सोनल मॅडम तुम्ही रील का नाही करत ?? मी सहज म्हटलं , ते काय असतय ?? .. मला माहीत नव्हतं असं नाही पण वाटलं नको तो नाद.. सारखा मोबाईल हातात धरुन बसतात लोक.. मग माझा व्यायाम ,,वाचन , लिखाण सगळं मागे राहील..
चार दिवसापासून जरा रील करु लागले आणि एका व्हीडीओला जवळपास २०० k व्ह्यु पाहिले आणि म्हटलं ,हा प्लॅटफॉर्म खुप मोठा आहे.. मला काय सांगायचय ते एकावेळी अनेक लोकापर्यत पोचु शकतं.. पण यात वेळ खुप जातो हे मात्र खरं..माझा वेळ फालतु गप्पा किवा रिकामटेकड्या लोकांसोबत घालवलेला मला अजिबात आवडत नाही .. पण इथे उलटच झालं.. काल j.w. marriott ला आत गेले आणि लॉबी मधे एकजण मला म्हणाला , तुम्ही सोनल मॅम का ?? तुमचे ब्लु सारीतील रील पाहिले होते..अतिशय सुंदर आणि फोटोत दिसता त्यापेक्षा खूपच स्लीम आहात.. एक फोटो घेउ का ?? त्याने क्वीक सेल्फी घेतला आणि Thanks म्हणत निघूनही गेला.. मला काही कळलच नाही.तिथे असलेले लोक पहायला लागले..
मनातच म्हटलं , रील असं असतय तर… जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलं तेव्हा तेव्हा नविन गोष्टीनी मला कायमच सुखद धक्के दिले..या जगात वाईट काहीच नाही हे पुन्हा एकदा सिध्द झालं.. कुठल्याही गोष्टीचा उपयोग आपल्या उध्दारासाठी करता यायलाच हवा.. योग्य वेळी केलेल्या योग्य गोष्टी आपल्याला प्रगतीवरच घेउन जातात..
चाहते , वाचक ज्यानी माझे मेसेज रील शेअर केले त्या सगळ्याचे मनापासून आभारी आहे.. नवनवीन गोष्टी जरुर आत्मसात करा.. शिकत रहा … वाचत रहा..
सोनल गोडबोले
लेखिका ,अभिनेत्री′