नांदेड ; प्रतिनिधी
कु मनाली महेश सुधळकर ही आपली नांदेड चि कन्या आहे तिचे bharatnatyam मध्ये विशारद झाले आहे, मनाली ने ह्या पूर्वी 2017 मध्ये इटली देशा मध्ये आपल्या नृत्या तून अनेक लोकांची मन जिंकली होती.
मनाली ने शिमला (dharohar)दिल्ली, मुंबई, हैदराबाद,नांदेड, औरंगाबाद अश्या अनेक ठिकाणी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले आहे.
त्याच बरोबर मनाली ला 2023 च्या वेरुळ अजिंठा फेस्टिवल च्या पूर्वरंग ह्या कार्यक्रमात आपल्या नृत्याचे सादरीकरण करण्याचे भाग्य मिळाले.
नांदेड येथील सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा सांस्कृतिक कार्यक्रम नांदेड येथे होतोच हा महोत्सव 2017 पासून आंतरराष्ट्रीय मंचावर देखील आयोजित होत आहे मध्ये कोरोना काळामुळे विदेशात कार्यक्रम बंद झाल्यामुळे दोन वर्षानंतर यंदाचा सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव 2023 दुबई येथे भारतीय दूतावास ऑडिटोरियम मध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्कृती मंत्रालय भारत सरकार, ग्लोबल बिझनेस फेडरेशन दुबई, क्लासिकल रिदम्स दुबई यांचा साथ लाभलं. सप्तरंग सेवाभावी संस्था दरवर्षी नांदेड आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा आयोजित करत असते यावर्षी हा मान दुबई करांना मिळाला दुबईमध्ये अनेक भारतीय लोक असल्यामुळे आपल्या संस्कृतीचा जतन व कार्यक्रमाचे आवड तिथल्या लोकांना देखील आहे.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारतातील 30 कलावंत व स्थानिक दुबई येथील 30 कलावंत यांनी संयुक्तरित्या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केलं. आजादी का अमृत महोत्सव आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस असे अनेक उपक्रम या कार्यक्रमाची जोडण्यात आले यामध्ये भारतीय संस्कृती संवर्धन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम दरवर्षी आंतरराष्ट्रीय मंचावर आयोजित करत असतो असे प्रतिपादन प्रस्ताविक मध्ये डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केलं. भारतीय संस्कृती ही विविधतेत एकतेचा संदेश देणारी आहे व अनेक धर्म असून देखील भारतीय हा एक असून एका नावाखाली एका झेंडा खाली येऊन आपली संस्कृतीचे संवर्धन करत असतो व हीच संस्कृती विदेशात व अनेक भागात प्रसारित व्हावं व भारतीय संस्कृतीचे नावलौकिक व्हावं या हेतूने सप्तरंग आंतरराष्ट्रीय महोत्सव विविध देशांमध्ये दरवर्षी आयोजन करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमाने आम्ही करत असतो असे मत देखील सान्वी जेठवाणी यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दूतावास चे वाइस कॉन्सुल जनरल श्री उत्तम चंद, संस्कृती मंत्रालय भारत सरकारचे प्रोडक्शन ग्राउंड स्कीमचे सदस्य श्री चंद्र प्रकाश, प्रजापिता ब्रह्मकुमारी दुबईच्या संचालिका ब्रम्हकुमारी ज्योती बहन, ग्लोबल फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर भाटिया, इंडियन हायस्कूल दुबईचे ट्रस्टी श्री हेमनदास भाटिया, बैंक ऑफ बरोड़ा दुबई चे जोनल मैनेजर श्री विनय कुमार शर्मा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्मृतीचिन्ह व भारतीय शाल देऊन सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी व सचिव श्री अक्षय कदम यांनी केलं.
सदरील कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय नृत्य बॉलीवूड चे गाणे उपशास्त्रीय नृत्य लोकसंगीत लोक नृत्य असे अनेक कार्यक्रम उपस्थित मान्यवरांना पाहण्यास मिळाले भारतीय दूतावास मध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाल्याचे तिथले पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले.
मनाली सुधळकर या व्यासपीठावर तिची प्रतिभा दाखवण्यासाठी खूप भाग्यवान होती. ती गुरु व्ही. सौम्यश्री पवार (देवमुद्रा – अ मुव्हमेंट स्कूल) यांची शिष्या आहे. तिने भगवान शंकराचे सुंदर नृत्य व्यक्त केले आणि तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. खचाखच असं भरलेलं सभागृह विविध सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असे कार्यक्रम पुन्हा व्हावं आणि अनेकदा दुबईमध्ये याच कराकरांना आम्हाला पहावयास मिळावं असे मत उपस्थित मान्यवर जाताना सर्व कलावंतांना सांगत होते.