आपल्यातला समजुतदारपणा हा सातजन्मापेक्षाही महत्वाचा-वटपौर्णिमा विशेष 

 

वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण आहे. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं.
आजही आपल्या घरातील परंपरा आणि वारसा जपण्यासाठी थोरा मोठ्यांना आवडतं म्हणून इतर दिवशी जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या बायका या वटपौर्णिमेला मात्र खास ऑफिसला सुट्टी घेऊन सर्व साजश्रृंगारासह वडाला फेऱ्या मारताना दिसतात. या सगळ्याचं अर्थातच कौतुक आहे. कुठे वडाचं झाड नाही सापडलं म्हणून वडाच्या झाड्याच्या फांद्या तोडून त्याचा वापर पुजेसाठी करतात.
पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी तर पोहचवत नाही ना? याचा विचार होणं देखील गरजेचं आहे. आपली परंपरा जपण्यासाठी वडाच्या झाडाच्या फांद्याची मोडतोड करणं हे चुकीचं आहे. खरं तर वडाच्या झाडाच्या फांद्या न तोडता या दिवशी वडाची अथवा अन्य झाडे लावून हे व्रत पूर्ण करता येईल का? हे व्रत केल्याने नवऱ्याचे प्राण खरंच वाचतात का? असे अनेक प्रतिप्रश्न निर्माण होत आहेत.
असा विचार करणे आता सद्यस्थिती गरज बनली आहे.
आता बऱ्याच महिला ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे केवळ फळांवर राहून त्याचा उपवास सांभाळून हे व्रत पूर्ण होऊ शकते का? इतकी ओढाताण करून नक्की काय मिळणार? बरं जेव्हा तुम्ही उपवास करता तर तुमच्या दीर्घायुष्यासाठी तुमचा नवराही तुमच्यासाठी उपवास करतो का? तोदेखील तुमच्याबरोबरीने हे व्रत करत असेल तुमची काळजी घेत असेल तर हे व्रत दोघांनी करण्यात जास्त मजा येईल का?
थोडा आता असाही विचार करून बघूया म्हणजे तुम्हाला वटपौर्णिमेचं महत्त्व अजून पटेल.
आपसात प्रेम नसेल किंवा समजुतदारपणा नसेल तर ह्या व्रताचा काय उपयोग?
वटपौर्णिमा करणाऱ्या महिलांच्या लग्नाला बरेचदा खूप वर्ष झालेली असतात. पण अशा जोडप्यांमध्ये खरंच प्रेम असतं का? एकमेकांविषयी आदर नसेल,एखाद्या महिलेचा नवरा नीट राहत नसेल , सतत बायकोला गृहीत धरत असेल तर असा नवरा जन्मोजन्मी खरंच मिळायला हवाय का?
या धावत्या काळात प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे कोणालाही कुणासाठी वेळ मिळत नाही. विशेष म्हणजे घरातल्या बायका यांना मुले,नवरा,आई-वडिलांसुद्धा वेळ देता येत नाही. त्यामुळे संसारात चिडचिडपणा वाढत आहे‌. त्यातुनच समजते कि आपसातला समजुतदारपणा संपुष्टात येत आहे. यामुळेच नाती-गोतीतील संबंध देखिल संपुष्टात येत आहेत. याचाच परिणाम असा की घटस्फोटाचे प्रमाण देखिल वाढत आहे. नवरा बायकोचे सात जन्माचे नाते कायम जोडुन ठेवायचे असतील तर समजुतदारपणा दोघांच्या अंगात असणे अत्यंत गरजेचे आहे. हाच समजुततदारपणा वेळीच कळला तर ह्याच जन्माची नाते फुलवू शकतो. विचार केला किंवा अभ्यासले तर सात जन्म तर काय, साधे सात वर्ष देखिल आपसातील नवरा बायकोचे नाते समोर टिकत नाहीत. त्याचे मुळ कारण म्हणजे समजुतदारपणा नसणे. जर असा समजुतदारपणा निर्माण करायचा असल्यास आजच्या घडीला जनजागृती करण्याची गरज निर्माण होऊ लागेल.
साताजन्माच्या गाठी बांधण्याचा सण आणि परंपरेने महिला आपल्या पतीला दिर्घायुष्य लाभावं यासाठी वट सावित्रिची पुजा करतात. वडाला धागा बांधुन आपल्या पतीची सात जन्माची साथ लाभावी. अशी अपेक्षा व्यक्त करतात.
वडाला फेऱ्या मारून हाच नवरा जन्मोजन्मी मिळू दे असं म्हणण्यापेक्षा सात जन्म तुझी पूजा करता यावी यासाठी ह्या वडाच्या झाडासारखा तु नेहमीच खंबीर असा माझ्या सोबत उभा राहा अशी प्रार्थना यावेळी नक्की वटपौर्णिमेला करा.

नाही तर,
“जन्मोजन्मी तुला मीच का हवा?
पुढच्या जन्मी मला थोडा चेन्ज हवा?”
असे म्हणणार्यांची संख्या पण आजकाल दिवसागणिक वाढत चालली आहे.

रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *