आजपासुन अधिकमास सुरु होतोय…काल झालेली अमावास्या ही दिप अमावस्या होती त्यालाच गताहार म्हणतात म्हणजेच आहारात बदल करायचा.. हलका आहार घ्यायचा म्हणजेच शाकाहारी रहायचं , कांदा लसूण बंद करायचा.. ड्रींक ,नॉनव्हेज बंद करायचं कारण हे तामसी पदार्थ असतात आणि ते भगवंताला चालत नाहीत..भगवदगीतेमधे लिहीलय की जो भोग भगवंताला न दाखवता खाल्ला जातो तो विष प्राशन करतो.. जे पदार्थ भगवंताला चालत नाहीत ते आपण का खायचे ??..
जी व्यक्ती चातुर्मासात या व्यसनापासुन दुर रहाते ती कायमस्वरुपी शाकाहारी राहु शकते.. फक्त एकदा विचार करा कुठल्याही प्राण्याचा जीव घेउन आपण सुखी राहु शकतो का ??आणि मी Indigenous nutrion शिकलेय त्यात सांगितले की मांसाहारात फक्त प्रोटीन्स असतात आणि शाकाहारी पदार्थात प्रोटीन्स , फायबर आणि चांगले फॅट्स असतात आणि आपल्या शरीराला या सगळ्याची गरज आहे..
हरीनाम घेउन आपण रोज प्रसाद खाल्ला तर आपल्यातील राग दुर होतो… आपण आतुन शांत होत जातो..
कोणाबद्दल आपल्या मनात द्वेष रहात नाही.. मत्सर नाही.. जेलसी रहात नाही आणि चांगल्या विचारात आणि चांगल्या लोकान्मद्गे राहील्याने आपली विचारसरणी बसलते म्हणून सत्संग महत्वाचा.. दारु पिणाऱ्या गृपमधे राहिलो तर कदाचित व्यसन लागु शकतं त्यामुळे चांगल्या गृपमधे रहा…अनेक स्त्रीया स्मोक ड्रींक करण्यात पुरुषांपेक्षा पुढे दिसतात.. खरच याची गरज आहे का??.. ते चित्र पाहिले की वाईट वाटतं .. आपण कष्टाने मिळवलेली लक्ष्मी आपण व्यसनात घालवायची का ?? .. याचा विचार व्हायला हवा आणि आपल्या शरीराचे काय आणि दुसरं म्हणजे आपली मुलं पुढे जाऊन अशीच वागली तर ??.. जरुर विचार करा..
जास्तीत जास्त हरीनाम घ्या आणि आनंदी रहा..
सोनल गोडबोले.. लेखिका