प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळांमध्ये परसबाग

 

कंधार ; प्रतिनिधी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळांमध्ये परसबाग विकसित करणे बाबत. संदर्भ:- 1.शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग प्र. क्र. 171/एसडी. 3 दि. 11.07.2023

2. या कार्यालयाचे पत्र जाक्र 10 शिअप्रा-9/2023 दिनांक. 13.07.2023 उपरोक्त विषयांकित संदर्भीयनुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत परसबाग उपक्रम सर्व शाळास्तरावर राबविण्याच्या अनुषंगोन संदर्भीय क्रमांक 2 अन्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी परसबाग विकसित केलेल्या आहेत. विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादीत भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे. केंद्र शासनाने देखील योजनेअंतर्गत शाळामधून परसबाग निर्माण करण्यात येऊन, परसबागमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश पोषण आहार अंतर्गत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नॅशनल फॅमेली हेल्थ सर्व 2019-2020 मधील अहवालामध्ये देखील परसबाग व पोषणमूल्ये यावर अधिकाधिक भर देणे बाबत अधोरेखित करण्यात आलेले आहे. शालेय परिसरात परसबाग विकसित केल्यामुळे, जिथे मुलांना त्याच्या स्वता:च्या भाज्या आणि फळे वाढवण्याची संधी मिळते, मुले शाळेत त्याच्या जेवणाचा भाग म्हणून त्यांनी उगवलेली ताजी फळे आणि भाज्या खाण्यास उत्साही होतील व अधिक आनंदाने आहाराचे सेवन करतील. यामुळे त्यांना लहान वयातच चागंला व पोषणयुक्त आहार घेण्याची सवय लागेल जी आयुष्भर राहील.

राज्यामध्ये नुकताच झालेला आहे. पावसामुळे वातावरणातील ओलाव्याचे प्रमाणे जास्त असल्याने सध्याचा कालावधी पाऊस सुरु परसबागांची उभारणी करण्याचा उत्तम कालावधी आहे. पावसाळ्याच्या कालावधी दरम्यान परसबाग उभारण्यसाठी कृती आराखडा विकसित करण्यासाठी प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ व इतर तज्ञ लोकाच्या विशेष सभा घेण्यात येऊन त्यामध्ये कृती कार्यक्रम ठरवून घेण्यात येऊन त्याप्रमाणे परसबागांची उभारणी करण्यात यावी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्र व इतर एन.जी.ओ. यांचे मदतीने तालुक्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबागांची उभारणी होण्याच्या दष्टिने आपण स्वताः पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करावी जेणेकरुन जिल्हातील सर्व शाळांमधून उत्कृष्ट परसबाग ही संकल्पना एक चळवळ म्हणून राबविण्यात येईल.

काही शाळांमधून विशेषता: नागरी भागामध्ये जागेची मर्यादा लक्षात घेता, अशा ठिकाणी शाळांच्या छतावर किंवा व्हींकल गार्डनची उभारणी करता येऊ शकेल. तांत्रिक मार्गदर्शनाकरिता कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्र व या क्षेत्रामध्ये कार्य करणा-या एन.जी.ओ. यांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे राज्यस्तरावरून गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील माहे स्पटेंबर-ऑक्टोंबर 2023 या महिन्यांमध्ये उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन उत्कृष्ट परसबागांची उभारणी करणा-या शाळांना रोख परितोषिके देण्यात येणार आहेत. आपल्या तालुक्यातील सर्व शाळा परसबाग उपक्रमामध्ये सहभागी होऊन सर्व शाळांमधून परसबाग विकसित करावी असे आवाहन शालेय पोषण अधिक्षक कंधार सुरेश पाटील जाधव यांनी केले आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *