विचित्र की वखवखलेला ??

 

गेले सहा महिने माझा एक वाचक मला मेसेज करत होता..,मॅम मला भेटायचय , मी इंजीनियर आहे , तुमच्याशी बोलायचय.. मी पुण्यात रहातो.. खूपच मेसेजेस केले म्हणुन काल वारजे कॉफी शॉप ला त्याला भेटले.. भेटल्याबरोबर त्याने काहीतरी बिझिनेस बद्दल बोलायला सुरुवात केली .. १० मीनीटाने मी त्याला म्हटलं.. sorry I am not intrested..मी त्याला म्हटलं , तुम्ही फोनवर मला काहीतरी वेगळं बोलला होता त्यावर ते म्हणाले , हे सांगितलं असतं तर तुम्ही मला भेटलाच नसता.. मला तुमच्याशी मैत्री करायची आहे.. त्यावर मी म्हटलं , तुम्ही मिथुन राशीचे आहात का हो ??.. त्यावर त्यानी हसुन मोठा पॉज घेतला आणि हो म्हणाले.. माझ्या अवतीभवती मिथुन ,मकर राशीची मंडळी खुप आहेत.. किवा म नावापासून सुरु होणारीही जास्त आहेत.. त्यांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली.. केमिकल इंजीनियर माणुस.. त्याचा ऑरा बिघाडला होता हे माझ्या लक्षात आले होते आणि ही व्यक्ती प्रचंड थापाडी ,खोटारडी आणि वासनेने बरबटलेली जाणवली.याच्यामुळे माझा ऑरा बिघडु नये म्हणुन मी हरे कृष्ण मनातच सुरु ठेवलं.. त्यानंतर ते म्हणाले , मी खोटं बोललो मॅम माझी रास सिन्ह आहे.. मी म्हटलं तुम्ही आताही खोटं बोलताय आणि आल्यापासून पण खोटच बोलताय..मग म्हणाले , बायको पण सिन्ह परत म्हणाले , sorry तिची रास कन्या आहे.. प्रचंड थापाडी रास कुठली हे मी ओळखलं होतं..
मग म्हणाले , तुम्ही वीर्य लेख लिहीला होता ना त्याचं तुमचं नाव कट करुन मी एकीला पाठवलं तर तिने विचारलं , हे सोनल मॅम नी लिहीलय ना ??तरीही मला त्याचा राग आला नाही तर कीव आली.. त्यांना शांतपणे म्हटलं, तुम्ही माझं नाव का काढलं ?? तर ते म्हणाले , एका लेडीला पाठवायचा होता म्हणुन.. खरं तर त्या गोष्टीचा नावाशी काहीही संबंध नाही पण खोटारडेपणा रक्तातच आहे .. प्रत्येक मिथुन वाला असा असेल असं नाही.. गैरसमज नसावा.. पण मला आलेले अनुभव असे आहेत.. माझे अनेक मित्र मिथुनचे आहेत .. ते सगळेच तसे नाहीत पण थापा मारुन समोरच्याला इंप्रेस कसं करायचं हे या लोकांकडुन शिकावं.. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही की ते कोणाला भेटले आहेत..१० मीनीटात कुंडली मांडुन मी मोकळी होते आणि अशा लोकांना पुन्हा भेटायचे कीनाही हे ठरवते..एकतर या मंडळीच्या हातुन काहीही सुटत नाही.. पार्टीला गेले तरीही हात हलवत जाणारी ही रास.. कदाचीत मी धनु राशीची असल्याने त्यांच्याशी माझा ऑरा मॅच होत नसावा.पण तरीही माझ्या वाचक सखीना सांगेन माणसे वाचायला शिका..अभ्यास करा.. मी हॅंडल करते तसं प्रत्येकीला जमेल असं नाही..परत त्या व्यक्तीला मी आयुष्यात पुन्हा भेटणार नाही कारण त्याचा खोटारडेपणा.त्याला भेटुन आयुष्यातील पाऊण तास मी वाया घालवला नाही तर एक आर्टीकल लिहुन झालं आणि माणसं ओळखायला पुन्हा नव्याने संधी मिळाली आणि खुप शिकायला मिळालं कारण मी प्रचंड सकारात्मक आहे…सोनलशी मैत्री करायला खरेपणा हवा बॉस..


सोनल गोडबोले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *