मुखेड – (प्रतिनिधी )
नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे पुढील वर्षापासून पदवी स्तरावर लागू केले जाणार आहे.यावर्षी ते पदव्युत्तर स्तरावर लागू करण्यात आले आहे. यात 1986 च्या शैक्षणिक धोरणातील आता सुरू असलेल्या टप्प्यात बदल करण्यात आले आहेत.हे धोरण जाहीर करून आता 29 जुलै 2023 रोजी तीन वर्षे पूर्ण होतील.या ′ विषय निवडीची बंदिस्त चौकट रद्द करण्यात आली आहे. यात कौशल्याधारित, मूल्याआधारित शिक्षण देण्यावर अधिकचा भर दिला आहे. प्रात्यक्षिकावर हे शिक्षण आधारित असणार आहे. यामुळे नोकरी मिळणा-या रोजगारक्षम अभ्यासक्रमाला महत्त्व दिले आहे. पुढील वर्षीपासून प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमात एक मेजर व द्वितीय सत्रात मायनर विषय निवडावा लागणार आहे. इतर विद्याशाखेतील दोन पेपर निवडावे लागणार आहेत.व्होकेशनल व स्किल इन्व्हासमेंट कोर्सला स्थान दिले जाणार आहे. भाषेला कमी महत्त्व दिले आहे. मूल्य शिक्षणावर भर राहणार आहे. या धोरणात 60 टक्के व 40 टक्के असे ऑफलाइन ऑनलाईन टीचिंग करता येणार आहे. त्यासाठीच्या सर्व सुविधा सरकार ऐवजी संस्था किंवा तेथील अन्य घटकांना उचलाव्या लागणार आहेत. तसेच विदेशी विद्यापीठ सुरू करायला मुभा दिली असून त्यांना फीस ठरवण्याचा व अभ्यासक्रम ठरवण्याचा व पदभरती करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. या बाबी गंभीर आहेत. या शैक्षणिक धोरणामुळे बहुविद्याशाखीय शिक्षण घेण्याची मुभा मिळणार आहे असे प्रतिपादन पिपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्रा.डाॅ.डी.एन. मोरे यांनी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथिल नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीकडून आयोजित नविन शैक्षणिक धोरण 2020 या अनुषंगाने आयोजित अतिथी व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रस्तुत महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा. डॉ. उमाकांत पदमवार यांनी म्हणाले की आपण भारतीय माणसं कुठलाही बदल सहजासहजी स्वीकारत नाहीत. हे धोरण तर आता काही प्रमाणात लागू झाले आहेच. त्यातही ते संपूर्णपणे स्वीकारण्याची मानसिकता या सप्ताहातून निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास यातून घडावा असी अपेक्षा हे धोरण करते. सुशिक्षित बेरोजगारी कमी व्हावी, नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात यश प्राप्त करता यावे हा उद्देश यामागे दिसतो. शासनाने आपल्याकडून काही अपेक्षा केल्या आहेत त्या पूर्ण करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या समितीचे प्रमुख प्रा.डी.सी. पवार यांनी केले व या कार्यक्रमा आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली व कोठारी आयोगापासून ते आजतागायतच्या शैक्षणिक धोरणांचा थोडक्यात आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ. रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार सहस्टाफ सेक्रेटरी प्रा.अरूणा इटकापल्ले यांनी मानले.कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.नागोराव आवडे, प्रा.डाॅ. सुभाष देठे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.