पुरूष हृदय भाग ३० – मित्रांच्या करामती

काल २९ वा भाग आणि आज लगेचच ३० वा लिहावा लागला.. लवकरच १०० भाग होणार असं दिसतय..

माझ्या पुरूष मित्रांच्या करामतीच इतक्या आहेत की लिहायला मज्जा येते .. आजचा आता आलेला ताजा मेसेज म्हणजे , मॅडम तुमच्याकडे सेक्सच्या कुठल्या गोळ्या मिळतात हो ??.. भावा ,गोळ्या घ्यायला लागु नयेत म्हणुन मी लैगिकतेचं शिक्षण देतेय.. गोळ्यापेक्षा सुरक्षित फॅन्टॅसीज ॲंड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी वाच आणि आनंद घे..
माझा इनबॉक्स कलरफुल बनवायला तुमचा मौल्यवान वाटा आहे.. त्यामुळे माझी वॉल पण रंगीबेरंगी झालेय.. एक जण म्हणतो , माझं तुमच्यावर प्रेम जडलय , अरे , प्रेम व्हायला मी भेटलेच कधी ??.. न भेटताच प्रेम होते ??हा नवीन विषय घेउन लिहायला मज्जा येइल..अरे दुरुन डोंगर साजरे बाबा कारण हे झेपणारं प्रकरण नाही.. एकदा सचिनला भेट म्हणजे कळेल ..
एक जण विचारतो ,Is this yur real profile ??.. नाही रे बाळा , प्रोफाइल पण फेक आणि लेखिका पण फेक.. पण मग खरं कोण असेल बरं ?? .. खऱ्याची दुनियाच राहीली नाही..
मॅडम , तुम्ही काय खाता हो ??.. इतक्या बारीक कशा ??.. तुम्ही बारीक व्हायला गोळ्या घेता का ?? देवा , एकीकडे एकजण सेक्सच्या गोळ्यांवर बोलतो आणि दुसरीकडे डाएट गोळ्या.. अहो , मी भाजी भाकरीच खाते पण भरपुर व्यायाम करते.. कुठल्याही गोळ्या घेउन शरीराची वाट लावु नका..
ही म्हणजे हाइटच झाली.. तुम्ही स्वतः लिहीता का सगळं ??.. याला काय उत्तर देउ मी..?? कोपरापासुन सलाम करते पण असले प्रश्न नको ना विचारु..
माझी बायको नाही म्हणते आणि प्रेयसी सुध्दा नाही म्हणते अशावेळी मी काय करु ??,,,कर्माला दोष दे .. अजुन मी तरी काय सांगु .. पण सगळ्या स्त्रीया अशाच असतात हे मात्र बोलु नकोस … मॅडम पुस्तक घ्यायचेय हो, पत्ता लागेल का ??.. अरे भावा , अजुन अशी सीस्टीम आली नाही नाहीतर मग कबूतराला पुस्तक घेउन पाठवावं लागेल..
सोनल मॅडम , तुम्हाला कोणी ट्रोल केलं तर मला सांगा ,बघतोच एकेकाला.. अरे पण कोण ट्रोल करतं हे बघायला मला वेळ कुठे आहे ??आणि दुसरं म्हणजे ट्रोलर नाहीत मग जगण्याला अर्थच काय ना.. त्यांना बिचाऱ्याना काम कमी आहे माझ्याकडे वेळ कमी.. त्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. आणि तुम्ही मेसेजेस केले नाहीत किवा फ्लर्टींग केलं नाही तर पुरूष हृदय कशी लिहु ??.. हेल्दी फ्लर्टींग करत रहा रे नाहीतर पुरूष म्हणुन जन्माला येवुन काय उपयोग ???..
तुम्ही आहात मित्रांनो म्हणुन स्त्रीला मान सन्मान आहे.. वाचक , ट्रोलर , जेलस होणारी मंडळी सगळेच माझे मित्र त्यामुळे शत्रू एकही नाही.. सगळ्यात सुखीही मीच आणि नशीबवानही मीच..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *