मोहरम ;हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणजे क्रांतिनगरी बहाद्दरपूरा येथील मोहरम एक सांस्कृतिक ठेवा!

 

कंधार तालुका म्हणजे पूर्वी पासून सांस्कृतिक ठेवा जतन करत हिंदू-मुस्लिम सर्व सण-उत्सव एकोप्याने व गुण्यागोविंदाने करत असतात.गणेशोत्सव,शिवजयंती,बसवेश्वर जयंती, शिराळदिनी भुलोबा शिराळशेठ,दुर्गाउत्सव,बैलपोळा, भीमजयंती, साठे जयंती असे किती तरी सण-उत्सव साजरे होतात.क्रांतिकारक सांस्कृतिक नगरी बहाद्दरपुरा, ता.कंधार ही नगरी दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी, सांस्कृतिक सण-उत्सवाची पंरपरा जतन करतांना माजी आमदार भाई गुरुनाथरावराव कुरुडे साहेब व अनेक सहकार्यांनी दिलेली तोलामोलाची साथ दिल्यामुळे हा सांस्कृतिक ठेवा अखंडित सुरु आहे.मोहरम म्हणजे बलीदानाची आठवण दरवर्षीच केली जाते.जंगे करबला या युध्दभुमीवर मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषीत हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांचे नातू हसेन व हूसेन यांच्या बलिदानास नतमस्तक होवून मातम (शोक) करण्याची पारंपरिक पध्दत आजतागायत सूरु आहे.त्या युध्दभुमीवर त्यांना पाणी सुध्दा मिळाले नाही.म्हणून दहावीच्या दिनी शरबत वाटप करतात.सवारी थंड झाल्यावर परत नदीकडुन येतांना “हाय हसेन-हुसेन हम न हुए।” म्हणत छाती बडवून मातम व्यक करतात.मोहरमच्या महिन्यात हसेन-हुसेन यांच्या बलिदानास अभिवादन करतात.मानसपुरी ता. येथील बडे कासिम दुल्ले या सवारीचा चांद आणि धट्ट्या या दोन्हीही चोरीला गेल्यामुळे मोहरम मध्ये ती सवारी बसविली जात नव्हती. त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेबांनी विधानसभे मध्ये त्या विषयीचा प्रस्ताव मांडून चंद्र आणि धट्ट्या शासनाच्या वतीने मिळवून दिल्या तेव्हापासून ती सवारी मोहरमला दरवर्षीच बसते. ही घटना जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वीची आहे. चा प्रस्ताव मांडणारे भाई केशवरावजी धोंडगे साहेब हे महाराष्ट्रामध्ये एकमेव दिसतात.मोहरम महिन्यात मानसपूरी येथील अश्रूखान्यात बडे कासिम दुल्ले ही सवारी ताजवा सोबत बसविली जाते.त्यांचे पुर्वीचे मुजावर अब्दुल्ला कासिम साब होते,तर देवकर काशिराम बोधगीरे होते.सध्या शे.गौस शे.जाफर,शेख बाहेर,शेख यादुल, शेख कासिम अब्दुल्ला व त्याचे सहकारी हिंदू-मुस्लिम मिळून करतात.ताजवा तयार करण्याचा मान उत्तम लष्करे यांचे असतो.ते कलावंत उत्कृष्ट ताजव्याचे निर्मिती करतात.दहावीच्या दिवशी ताजवा सवारी सोबत रणजित ठाकुर यांचे कडे जातो.उदाण धरण्याची परंपरा त्र्यंबक कोंपलवार व गंगाधर कोंपलवार यांच्या जाते.हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असल्यामुळेच मानसपूरी नगरीत आठरापगड भक्तांनी चंदा करुन भक्ती भावाने अश्रूखाना बांधुन सज्ज केला.दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे.असे त्यांनी बोलून दाखवले. आयुष्याच्था शेवटच्था क्षणा पर्यंत आमच्या सवारीला डाॅ.भाई साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.कोणत्याही प्रसंगी आम्हाला साहेबाचा आधार होता.सर्वात आधी त्यांची अर्धीक मदत मोहरमा ते आवर्जून पाठवून देत.सध्या त्यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यंदा मोहरमात आपल्या सहकार्यासह माजी सरपंच बहाद्दरपूरा, भाई माधवराव पेठकर,माजी उपसरपंच भाई भांगे व गुरुनाथराव पेठकर आल्याने आम्हास समाधान वाटले.मोठे कासिम धुल्ले या सवारीचे सध्याचे देवकर म्हणून बाबुराव बोधगीरे साहेब आहेत.त्या सोबत कासिम भाई, मियाॅ भाई व त्यांचे सहकारी सवारी व डोला (ताजिया)तयार करतांना सहकार्य करत असतात.
मोहरम सातवी तारीख मानसपुरीचे कासिम धुल्ले बहाद्दरपुरी जावून छोटे कासिम धुल्ले यांना उठविता.त्यांनंतर छोटे नालेहैदर मेहताब शाह सवारीस भेटून डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या मुक्ताई प्रभा निवास्थानी भेट देवून मोठे नालेहैदर अर्थात काळबा सवारीस भेटून मोठी दर्गाहला लाभेटून परत मानसपूरीस परत येते.आठवीला छोटे नालेहैदर प्रथम उठल्यानंतर मोठे नाले हैदर यांना भेटण्था आधी डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या मुक्ताई-प्रभा निवास्थानी भेटण्यास जाते.त्यांनंतर कंधार शहरातील दोन्हीही दर्गाहांना भेटून मानसपूरी मोठे कासिमदुले यांना भेटून बहाद्दरपूरी आपापल्या आश्रूखान्यात येऊन स्थानापन्न होतात.नववी ला बहाद्दरपूरा येथील तेलंगपुरा येथील छोटे कासिम दुल्ले मानसपुरी येथील मोठ्या कासिम दुल्ले यांना उठवते.यास “खडी सवारी”म्हणतात.या सवाऱ्या दोन्हीही दर्गाह येथे जातात.तिथे संदल निघुन शरबत वाटप करुन आवाला शिलगीविल्या जाते.कोटबाजार येथील ग्राम पंचायत जवळ दोन्ही छोट्या मोठ्या भावांची भेट होवून सुर्योदय होण्याच्या आत आपापल्या अश्रूखान्यात येवून स्थानापन्न होतात.मोहरम दहावीच्या मानसपूरी येथील कासिम दुल्ले गावतच मजमा करुन अश्रूखान्यात थंड केल्या जाते.तेलंगपूरा बहाद्दरपूरा येथील छोटे कासिम दुले मेहताबशाह साहेबांची सवारी छोटे नालेहैदर व बाबाशाह साहेब यांची मोठे नालेहैदर (काळबा)ची सवारी यांना भेटून डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या व भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या घरी भेट देवून गावातच मजमा करुन अश्रूखान्यात जावून थंड केल्यानंतरच मोठे व छोटे नालेहैदर दहावीला उठून मुक्ताई प्रभा निवास्थानी व सुलोचना निवासस्थानी भेटून गावात मामा करुन कंधार येथील दर्गाहला भेट देवून शांतीघाटावरील मनकर्णिकेच्या राजीव सागराकडे थंड होण्यास रात्री १२ च्या सुमारास जावून येतांना हसेन-हुसेनचे विरह गीत गात आपापल्या अश्रूखान्यात परत येतात.
बाकीच्या तीन सवाऱ्या बहाद्दरपूरा येथे बसतात.त्यातली छोटे कासिम दुल्ले तेलंगपुरा येथे बसविल्या जाते.पुर्वी दादामिया शेख सध्या सलीम भाई खाजासाब बसवितात.देवकर अलमदार गंगाधर शंकरराव यादगीरवाड आहेत.पण तेलंगपुरा येथील सर्व हिंदु बांधव मोठ्या संख्येने ही सवारी बसविण्यात सहभागी होतात.त्यात बनु तोटवाड साहेब,यादगीवाड,पुपुलवाड, आकुलवाड,जवादवाड,यासीन शेख आदी जणांचा समावेश होतो.मोठे नाले हैदर म्हणजे काळबाची सवारी नावने प्रसिद्ध आहे.बाबाशा शेख यांची सवारी म्हणुन ओळखल्या जाते.

 

त्यांचे आलमदार(देवकर) जफरशाह कलंदर होते सध्या बाबाशा साहेबांची मुले, सरवर,महेबुब,मुसा, ही भावंडे सहभागी होत होते.आता युसुफ, अफसर,अमर,रियाज शेख, जबार शेख,कय्युम शेख, याकूब शेख हे करतात. देवकर म्हणून सुरेश आनंदराव बलशेटवाड आहेत.दिवंगत भाई केशवराव धोंडगे यांच्या घराजवळची सवारी ताजव्या सह बसते.पूर्वी महेबुब साहेब शेख (चिठ्ठू मामू) ताजवा तयार करत अनेकदा मला पाचारण करुन सजावटाची संधी दिली.या ताजव्याचे मानकरी असलम शेख मुल्लाजी आहेत.आलावा पेटवून आठवीला सवारी उठून विठ्ठल मंदिर शेजारी असलेल्या महेताब शहाची सवारी म्हणजे.छोटे नालेहैदर यांना उठविण्यास येते.मेहताब शाह म्हणजे नालेहैदर व विठ्ठल मंदिरात गावात तेल मागुन दिवा दैनंदिन लावत असत.त्यांच्या अशा अवलिया कार्यामुळेच ते बहाद्दरपूरा पंचक्रोशीत नावलौकिक मिळविले होते.

 

ही सवारी आमच्या गल्लीतील अन् दिवंगत डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचे घराकडील म्हणून प्रसिद्ध होती.या सवारीचे पुर्वी यासिनसाब शेख नंतर रहेमत शेख व खादर शेख आणि सध्या इमाम शेख, खलील शेख,खदीर शेख, व्यवस्थापक करतात. त्यांना पूर्वी सवारी उत्कृष्ट बांधणारे सय्यद आजम व सय्यद मीर ही दोन भावंडे त्यांना साथ देणारे परशूराम पापडू, महमद अली साहेब यांचा परिवार मगदुम शेख यांचा परिवार इतर आदी परिवार साथ देत.सय्यद मोहद्दीन, बाबनसाब लखेरे, मगदुम पाशामियाॅ साठापूरे,आमचा एमेकर परिवार, आमची सर्व गल्ली यात सहभागी होते.पूर्वी आलमदार दशरथराव बोईनवाड यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे चालवली.आता दशरथराव यांचे कनिष्ठ चिरंजीव गोविंदराव बोईनवाड हे देवकर म्हणून आपल्या घराण्याचा वसा पुढे चालवता.तनावा अनेजण घेतात.विशेष म्हणजे बापदादापासून सवारी सोबत मशाल धरण्याची परंपरा बहाद्दरपूरा कडू गल्लीतील सावरकर परिवार आजही नित्याने करतो आहे.व्यंकटराव सावरकर ही परंपरा सुरु ठेवली आहे.मोहरम महिन्यात सवारी म्हणजे जंगे कलबला येथील युध्दभुमीवर धारातीर्थी पडलेल्या हसेन-हूसेन या दोन भांवडाच्या शौर्यगाथेस अभिवादन होय!दिवंगत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पुढाकाराने अश्रूखाना तेलंगपूरा येथील व नदीकडील नालेहैदर अश्रूखाना आरसीसी बांधुन दिले.

 

असा सांस्कृतिक ठेवा मानसपूरी व बहाद्दरपूरा या दोन्ही ठिकाणी जतन करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक समजल्या जाते.हसेन-हूसेन यांच्या बलिदानास विनम अभिवादन! गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *