चला वाघ वाचवूया…!!

 

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे अशी याची ओळख आणि ख्याती आहे.२९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून साजरा करताना या वाघांचे जंगलातील अस्तित्व सुरक्षित राहावे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत हा या मगचा मुख्य उद्देश आहे.२९जुलै२०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
आज देशभरात ३९ व्याघ्र प्रकल्प आहेत.भारत हा जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.त्यातही एकटया महाराष्ट्रात ६९ वाघांची वाढ झाली आहे. वाघांची वाढ म्हणजे वनवृद्धीचे प्रतीक आहे.तसेच वाघ हा भारत देशाचे शौर्य चे प्रतीक आहे.भौगोलिक परिस्थिती नुसार वाघाचे वर्गीकरण केले जाते उदा.बंगाल वाघ,सायबेरियन वाघ,साऊथ चायना वाघ,इंडो–चाइनीज वाघ आणि मलेशियन वाघ.आपल्या भारतात वाघांची शिकार रोखण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
वाघ हा एकटा राहणार प्राणी असून तो आपल्या क्षेत्रात झाडावर मूत्राचे फवारे मारून ठेवतो तसेच आपल्या नखांचे ओरबाडे तो आखुन ठेवतो.नर वाघ आपल्या क्षेत्रात अनेक वाघिणींना सामावून घेतो, पण तोच नर वाघ इतर नर वाघांना आपल्या क्षेत्रात येण्यास मज्जाव करतो हे त्याचे वैशिष्ट्ये आहे. सांबर हे वाघाचे आवडते खाद्य असून रानडुक्कर,हरीण,नीलगाय , रानम्हैस,चितळ,भेकर इत्यादी प्राण्याची शिकार सुद्धा करत असतो. वाघ हे बहुतांशी एकट्याने शिकार करतात .
जगात फक्त चीन,रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती पाहायला मिळतात.जगातील एकूण वाघांपैकी५० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,आणि ती आपण सर्वांनी उचलणे आपले आद्यकर्तव्य आहे.केवळ शुभेच्छा देण्यापुरताच व्याघ्र दिवस असू नये तर व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.

 

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

 

—-+——-

 

Dilip dada Dhondg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *