लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे याच्या जयंतीनिमित्त प्रदेशअध्यक्ष डी.पी.आय.मा अजिंक्य भैया चांदणे, यांचे तडाखेबंद भाषण

कंधार ; प्रतिनिधी

दि २८ जुलै २०२३ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित *सामाज प्रबोधन कार्यक्रमात डी पी आय प्रदेशाध्यक्ष मा अजिंक्य भैया चांदणे यांचे तडाखेबंद* असे भाषण झाले. या कार्यक्रमात सर्व महापुरुषाना अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलन यांने कार्यक्रमाची सुरूवात झाली.या कार्यक्रमात
आपले मत मांडताना *शिक्षणाचे महत्व, मताचा अधिकार, महापुरुषाचे विचार,* आजची आपल्या समाजाची प्रगती यावर आपल्या अनोख्य शैलीमध्ये विचार मांडला व *सोबतच जातीव्यवस्था , नाही रे अशी मानसिकता* असणाऱ्या लोकांना खडेबोल सुनावले.*छत्रपती शिवाजी महाराज आणि लहुजी साळवे याची स्वामीनिष्ठा यावर भाष्य केले. ” जगबदल घालुनी मज घाव, सांगून गेले भीमराव” असा संदेश का दिला याचे विवेचन केले.महात्मा बसवेश्वर याचे तत्वज्ञान,महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार* आजच्या युगात कसे पोषक आहेत हे सांगितले. आजच्या पिढीला *शिकून मोठे होण्याचा* मूलमंत्र दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक *प्रा. माधव जाधव सर*( मनोविकास विद्यालय कंधार ) यांनी केले तर आभार *मा. महेंद्र कांबळे* यांनी केले. आजच्या *कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एन. एम वाघमारे सर* केंद्रप्रमुख मंगलसांगवी तर उदघाटक *श्री मुनेश शिरशीकर* उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना नांदेड हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री रविराज जाधव* यांनी केले तर *श्री बाबुराव टोम्पे* यांनी अनुमोदन केले. साठेनगर येथील *मनोज कांबळे, अभिजित भैया शिरशीकर, पराक्रम कांबळे* यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच *लहुजीनगर येथील मामा गायकवाड व मित्रमंडळ कंधार* यांच्या तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

 

*अहमदपूर येथील सूर्या युवा ग्रुपने यांनी देखील सत्कार केला.*
या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात महिला, युवक, सामजिक कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते. *आजच्या कार्यक्रमाचे आयोजन यासाठी निरंजन वाघमारे, कैलास कांबळे, राजू मळगे,सचिन कांबळे, विकास कांबळे, महेश कांबळे, गंगाधर कांबळे , दयानंद मळगे अण्णाभाऊ साठे जयंतीमंडळ व मित्रमंडळ साठेनगर* यांनी परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *