दै. चालु वार्ताच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त उत्कृष्ट वृत्तसंकलनाचा पुरस्कार ओंकारभाऊ यांना मिळाल्याचे घोषीत झाले. मला अतिशय आनंद तर झालाच पण पुरस्कार योग्य माणसाची निवड झाली असे वाटले. काही पुरस्कार असे असतात की ते योग्य व्यक्तीला भेटले तर तर त्या पुरस्काराचे मूल्य ही वाढते. आजुबाजुला अनाठायी पुरस्काराची लयलुट पाहिली की मन विषण्ण होत व या पार्श्वभूमीवर असे पुरस्कार व अशा व्यक्ती उठून ठळक दिसतात.
लव्हेकर व दिग्रसकर कुटुंबीयांचा स्नेह जिव्हाळा गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचा आहे. आमचे व त्यांचे कौटुंबीक दृढ संबंध . ओंकारभाऊ माझ्यापेक्षा एक वर्गाने पुढे पण शाळा एकच ,आवडी निवडी व छंद सारखेच त्यामुळे आम्ही अगदी मित्रासारखे वागलो. दाघांचे बरेच गुण सारखे त्यामूळे आमची खुप गट्टी जमायची. तो उत्तम वक्ता मलाही आवड त्यामुळे आम्ही दोघांनी वादविवाद स्पर्धेत एक टिम म्हणून तालुका व जिल्हास्तरीय अनेक स्पर्धा गाजवल्या ! अगदी लहान भावासारख तो मला त्याच्या सोबत घेऊन सर्व कामात सहभाग नोंदवायचा कॉलनीतील सार्वजनिक गणपती मंडळाची सुरुवात त्यानेच केली त्याचे कार्यक्रम व नियोजन वाखाणण्यासारखे असायचे.
तो एक उत्कृष्ट कथाकार , कवी, लेखक नाटकलाकार तर आहेच पण तो उकृष्ट पत्रकार देखील आहे. गेल्या तीस वर्षापासून पत्रकारितेचा त्याला अनुभव आहे. बातमीमागची बातमी लिलया पकडण्याचा त्याचा हातखंडा आहे. विविध वर्तमानपत्रासाठी त्याने काम केले पण सचोटी आणि प्रामाणिकपणा याच्याशी कधीही तडजोड केली नाही. याच अनुभवाच्या जोरावर दै. चालू वार्तामध्ये मराठवाडा उपसंपादक ही जबाबदारी तो लिलया पेलतो आहे. यात त्याने चालू केलेले ‘ मन्याडीचा हिरा व स्वर कोकीळाचा अन् गंध सुखाचा हे सदर जे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरले.
सतत हसमुख चेहरा, विनम्र स्वभाव, मुर्ती लहान पण किर्ती महान असे व्यक्तीमत्व, प्रचंड जनसंपर्क, उत्साहाचा खळखळता झरा म्हणजे ओंकार भाऊ ! त्याच्या संपर्कात आलेला व्यक्ती सुद्धा एकदम उत्साहित होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते.
आईवडीलाची मनोभावे सेवा करणारा व सर्व कुटुंबाला एकत्रित ठेवणारा दुआ म्हणजे ओंकारभाऊ . तो घरात सर्वात लहान पण सर्वांना सांभाळून घेणारा, प्रत्येक कामात पुढे सरसावणार, वागताना बोलताना अगदी निर्मळ स्वच्छ भाव ,जसा आत तसा बाहेर असे हरहुन्नरी व सदाबहार व्यक्तीमत्व ! किती लिहाव किती कौतुक कराव असा माझा हा भाऊ, सखा, उत्तम मार्गदर्शक व पाठीराखा म्हणजे ओंकारभाऊ !
विमाक्षेत्रातही त्याची कामगीरी अशीच बहारदार संपूर्ण जिल्ह्यात विमाक्षेत्रात दबदबा असलेले एकच नाव म्हणजे ओंकारभाऊ . मी तर म्हणेन कंधार सारख्या ग्रामीण तालुक्यात खेड्या पाड्यापर्यंत विम्याचे नाव कोणी पोहचवले असेल तर ते ओंकार भाऊने अगदी सी. एम . क्लब मेंबरशिप पर्यंत मजल मारली, दरवर्षीच ! यातही अनेक पुरस्कार !ज्या क्षेत्राला हात लावला त्या क्षेत्राचे सोने केले.
मला पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकायची संधी त्याच्यामुळेच भेटली. तुझ्यासारखी माणस मला या क्षेत्रात पाहिजेत म्हणून त्याच्या या प्रेमळ हाकेला ओ देऊन मी या क्षेत्रात पाऊल टाकलं. खर तर एखाद्याला पुढे नेण प्रमोट करणे भल्याभल्यांना जड जाते पण हे व्यक्तीमत्वच वेगळ !
पुढच्याची मनापासून स्तुती करणारा , त्याच्या आनंदात आनंद मानणारा, पुढच्याच्या यशाचे तोंडभरून कौतुक करणारा व्यक्ती म्हणजे ओंकारभाऊ ! फार कमी माणस अशी असतात ज्यांच्यात हे गुण आहेत कारण समोरच्याचे कौतूक करणे त्याला मोठेपणा देणे हा गुण लुप्त होत आहे.
ओकार भाऊ सोबतचा वेळ म्हणजे अखंड चैतन्याचा झराच!
अशा या परीसस्पर्शी व्यक्तीमत्वास दै. चालुवार्ताच्या वर्धापनदिनी उत्कृष्ट वृत्तसंकलनाचा पुरस्कार मिळाला मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स हॉल टिळकरोड स्वारगेट पुणे येथे भव्य व शानदार कार्यक्रमात शाल,पुष्पहार व सृतिचिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. ओंकारभाऊ तुझे खूप खूप अभिनंदन ! खरच मला मनापासून खूप आनंद झाला कि योग्य व्यक्तीने योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली तुला तुझ्या भावी जीवनात असेच अनेक मोठे पुरस्कार मिळो व असेच दैदिप्यमान नाव होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो .
प्रा. विजयकुमार प्र. दिग्रसकर
मो. नं.9421627407