100 फुटाच्या रस्त्याच्या कामासाठी माजी सैनिक संघटनेचा बेमुदत उपोषणाचा इशारा ..! सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंत्याला दिले निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार  शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचा  कामाला सुरुवात झाली आहे हि आनंदाची बाब असून त्याचप्रमाणे महाराणा प्रताप चौक ते संत भगवान बाबा चौकापर्यंत शंभर फुटाचा रस्ता मंजूरी आहे मात्र  त्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होत आहे . सदरील गैरसोय टाळण्यासाठी रहदारीचा असणाऱ्या या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करावे , तसेच बहादरपूरा जंगमवाडी रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा दिनांक 28 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर माजी सैनिक संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .

शहरातील महाराणा प्रताप चौक ते संत भगवान बाबा चौक रस्त्याचे वर्क ऑर्डर निघून  बरेच दिवस झाले आहेत हे काम अंदाज पत्रकानुसार शंभर फुटापर्यंत करावे तसेच रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला केलेले अतिक्रमण हटवून रस्ता शंभर फुटाचा करावा आणि बहादरपुरा  जंगमवाडी रस्त्यावर मोठे मोठे खडे पडले आहेत त्यामुळे लहान सहान अपघात होत असून मोठा अपघात व त्यातून होणारा अनर्थ टाळण्यासाठी हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करावा यासाठी आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सहाय्यक अभियंता श्रेणी एक सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन माजी सैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आले , तसेच दिनांक 28 ऑगस्टपर्यंत काम सुरू करावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा माजी सैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .

यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , कंधार तालुका अध्यक्ष अर्जुन कांबळे यांच्यासह माजी सैनिकांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *