फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार – गोविंदराव मंगनाळे

 

कंधार: विश्वंभर बसवंते

नांदेड ते उस्माननगर – फुलवळ मार्गे उदगीर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे काम गेली दोन ते तीन वर्षांपासून चालू असून फुलवळ बस स्थानकावर एका बाजूचा सर्व्हिस रोड व नाली बांधकाम अद्याप पूर्ण करण्यात आला नसल्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय फुलवळ व ग्रामस्थांनी संबंधित कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करूनही सदर काम पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे.

परंतु अद्यापही ते काम पूर्ण करण्यात आले नसल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न चांगलाच पेटला असून, येत्या ७ दिवसात अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा दिनांक.१ सप्टेंबर २०२३ रोजी “रस्ता रोको” करून तीव्र आंदोलन करणार असल्याचे येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी गोविंदराव भुजंगराव मंगनाळे यांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे.

सदर बाबी संदर्भात मंगनाळे यांनी संबंधित सर्व संबंधित कार्यालयाला लेखी निवेदन दिले असल्यामुळे ही बाब आता चर्चेचा विषय बनला असून, जाणीवपूर्वक डोळेझाक पणा करणारे अधिकारी , कर्मचारी आता तरी काही पावले उचलतील का..? आणि प्रशासन संबंधित ठेकेदाराकडून हे अर्धवट काम पूर्ण करून घेणार का..? याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले असल्याचे ऐकावयास मिळत आहे.
सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे काम करणाऱ्या ठेकेदाराने “फुलवळ” येथील रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पळ काढला आहे. दोन वर्षांपासून हे अर्धवट काम कधी होणार या प्रतीक्षेत असलेल्या फुलवळ च्या ग्रामस्थांसह प्रवाशांनी सदर रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याचे पाहिले असून, भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी सदर रस्त्याचे काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असल्याने फुलवळ ग्राम पंचायत पंचायत चा ठराव घेऊन त्या ठरावाच्या प्रतिसह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड , सार्वजनिक बांधकाम विभाग , राष्ट्रीय महामार्गासी संबंधित सर्व कार्यालयांना लेखी पत्रव्यवहार करून, सदरचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करावे, अशी विनंती केली आहे.
तसेच फुलवळ ग्रामस्थांनी संबंधित सर्व कार्यालय , माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण , स्थानिक आमदार मा.श्यामसुंदरजी शिंदे , उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार,तहसील कार्यालय कंधार , पोलीस ठाणे,या कार्यालयास लेखी निवेदन देऊन काम पूर्ण करण्याची विनंती केली आहे. परंतु आजपर्यंत कोणीही या कामाची दखल घेतली नसल्यामुळे सदर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण झालेच नाही , परिणामी या रस्त्यावरील अपघाताची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या विषयाची दखल घेऊन आजपर्यंत केलेल्या पत्रव्यवहार आणि प्रकाशित झालेल्या विविध वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोज बुधवारी फुलवळ येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी गोविंदराव भुजंगराव मंगनाळे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन सदरच्या राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित सर्व कार्यालये , जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस ठाणे कंधार , स्थानिक आमदार व राष्ट्रीय महामार्ग कार्यालय नांदेड येथे लेखी निवेदन देऊन रस्त्याचे अर्धवट काम आणि नालीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा येत्या ता.१ सप्टेंबर २०२३ रोजी फुलवळ येथे रास्तारोको करून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात सदर च्या अर्धवट कामासंदर्भात फुलवळ ग्राम पंचायत ने संबंधित कार्यालये व जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी ग्राम पंचायतच्या ठरवासह लेखी निवेदन देऊन काम पूर्ण करण्याची विनंती केल्याचे स्मरण करून देणे, विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या, त्याच बरोबर पत्रव्यवहार केलेल्या निवेदनांची छायांकित प्रत,या निवेदनासोबत जोडल्या आहेत.

दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत सदर रस्त्याचे अर्धवट कामास तात्काळ सुरुवात करून, भविष्यात होणारे अपघात व जीवित हानी टाळावी, अन्यथा दिनांक १ सप्टेंबर २०२३रोज शुक्रवारी रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळवले आहे.
निवेदन देण्यासाठी गोविंदराव मंगनाळे यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार,संतोष रंजिरे,बाबुराव बसवंते,बालाजी बसवंते, गफार शेख,नवनाथ बनसोडे उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *