कंधार ; प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उपसेवा केंद्र कंधार संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहेनजी व छ.शंभूराजे इंग्लिश स्कूल कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून कंधार पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड
यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीसांना राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला .सतिश भाई, शंकरराव ढगे, माजी सैनिक नवघरे आदीनी पुढाकार घेतला .
कंधार तालुका म्हटले की आठवते राजकीय चळवळ आणि सांस्कृतिक जतनाचा ठेवा हे देशपातळीवर नावारुपास आले.रक्षाबंधन सणानिमित्त छ.शंभूराजे इंग्लिश स्कूल कंधार या ज्ञानालयातील चिमुकल्यांनी शाळा स्थापन झाली तेंव्हापासून प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या संकल्पनेतून प्रा.डाॅ सौ.मनिषाताई पुरुषोत्तमजी धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील कंधार पोलिस स्टेशन आवारात पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकाड यांच्या सहित उपस्थित पोलिस बांधव पी.एस.आय. मुखेडकर व आदरणीय इंद्राळे ,
चाटे यांचे सहित सर्व पोलिस बांधवांना रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी पार पडला.
या प्रसंगी प्राचार्या फरहाना मॅडम,प्रा.सुभाषराव मुत्तेमवार सर,ज्योती बहेनजी, चव्हाण मॅडम,वंजे मॅडम, खान मॅडम , शेख सुलतान सर,कुरंदे सर,पालक चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते.