…. विवाहबाह्य संबंध आणि नैराश्य..
कोल्हापूरचे वाचक ज्यानी माझी युट्युब वर मुलाखत पाहिली आणि मेसेज केला..मॅम मला अर्जंट तुमच्याशी बोलायचय आणि तुम्हीच यावर उत्तम मार्गदर्शन करु शकता..
त्यांनी फोन केला त्यावेळी आवाजावरुनच कळत होतं की त्यांना मानसिक त्रास झालाय.. ते कामानिमित्त कोल्हापूरच्या बाहेर असतात आणि त्यांची पत्नी आणि मुलं कोल्हापूरमधे घरी रहातात.. तिचे ′ विवाहबाह्य संबंध आणि नैराश्य..आणि तिने ते मान्यही केलय .. मॅम मला काउंसीलींगची गरज आहे..
तीही रडतेय आणि आमचं घर कोलमडुन गेलय .. आत्महत्या करावी वाटते आहे.. नैराश्य आलय..मला तिला घटस्फोट द्यायचा नाही आहे ..
त्यांना म्हटलं , मला दोघांशी बोलावं लागेल .. तुम्ही पुण्यात आला तर भेटु..या कपलवर मी आता काहीही लिहु शकत नाही कारण मला इतकीच माहीती आहे पण अशी अनेक कपल्स यातुन भरडली जातात .. हा विषय खुप मोठा आहे.. याचा संबंध पूर्वजन्म, अध्यात्म ते आताची त्यांची वैचारिक , आर्थिक , शारीरिक ,मानसिक गरज आणि स्थिती यावर अवलंबून आहे.. मला वाटतं मी यावर सीरीज लिहावी म्हणजे सविस्तर लिहीता येइल .. तिचा विचार केला तर नवरा इथे नसताना तिची शारीरिक गरज असावी पण हेच उलट नवऱ्याच्या बाबतीत झालं असतं तर ??.. याही दोन्ही बाजूचा विचार करायला हवा ना.. बदल हवा ,मित्र मैत्रीणी हवेत हे जितकं नैसर्गिक आहे तितकच आपल्या संसारावर याचा काय परिणाम होतोय किवा होइल याचा सारासार विचार व्हायला हवा.. त्या स्त्रीचा जो मित्र आहे त्याची बाजु , त्याची गरज त्याची वैचारिक , मानसिक , शारीरिक गरज आणि त्याचं कुटुंब हा खुप मोठा गुंता आहे.. आपल्या इंद्रीयांवर ताबा मिळवणं सुध्दा खुप अवघड आहे त्यासाठी अध्यात्म खूपच उपयोगी आहे पण देव कोणालाच नकोय .. मंदिराच्या जवळ येउन हात जोडण्याची सुध्दा लोकांची मानसिकता नसते ..
आजचा लेख नक्कीच अपूर्ण आहे कारण विषय मोठा आहे.. त्याची एक एक बाजु मांडण्याचा प्रयत्न करेन.. आपला पार्टनर सोडुन जेव्हा तुम्ही इतर व्यक्तीच्या संपर्कात येता तेव्हा किती लेव्हलपर्यंत ती इंव्हॉलमेंट असावी आणि आपण काय वागतो याचं भान असायला हवं..
अशा मंडळीना मी एकच सांगेन कुठल्याही गोष्टीवर आत्महत्या हे सोल्युशन नाही.. आत्महत्या करणं पाप आहे. मीमधे वाचलं होतं .. घाबरून किवा संकटापासुन पळुन जो आत्महत्या करतो त्याला पुढच्या जन्मी राहिलेलं भोगावच लागतं त्यातुन सुटका नाही.. नवरा बायको व्हिलन नसुन मित्र व्हा.. एकमेकांशी मोकळेपणाने बोला.. काय हवय काय नकोय काय चुकतय यावर चर्चा करा.. माफी मागा आणि माफ करायला शिका.. चुका होतात कारण आपण माणसे आहोत पण त्यातुन सुधारता ही यायला हवं ना.नात्यात संवाद
वाढवा .. आणि चुकीच्या व्यक्तीकडे सल्ले तर अजिबात मागायला जाऊ नका..
काळजी घ्या.. आनंदी रहा.. हरे कृष्ण
सोनल गोडबोले.. लेखिका