नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात टपाल सेवेचा लाभ घेण्याचे डाक विभागाचे आवाहन

 

नांदेड  दि. 14 :- नांदेड शहरात एकूण 15 पोस्ट ऑफिस कार्यालय कार्यरत आहेत. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (एसबी), आवर्ती खाते (आरडी),राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) जारी करणे, किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक आवर्ती ठेवी (एमआयएस), सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत पत्र इ. बँकिंग सेवा तसेच पोस्टल जीवन विमा (पीएलआय), मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, पार्सल इ. सुविधा उपलब्ध/ कार्यरत आहेत.

 

नांदेड प्रधान डाकघर येथील गर्दी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात जाऊन टपाल सेवेचा लाभ घ्यावा. वरील प्रकारच्या सेवेस कार्यालयीन वेळेत कुणीही टाळाटाळ केल्यास अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांना दुरध्वनी क्र. ०२४६२-२३१५२१/ २३१८७७ या क्रमांकावर ( सकाळी 10 ते सायं. 6 यावेळेत ) संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाचे अधिक्षक यांनी केले आहे.

 

भारतीय डाक विभागाचे सर्व काम ऑनलाईन चालु असल्याने बचत खात्याचे काम कुठेही करता येते. नांदेड शहरातील पोस्ट ऑफिसचे नाव व कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे. नांदेड प्रधान डाकघर कार्यालय, पत्ता शिवाजी पुतळ्या जवळ, रेल्वे स्टेशन रोड नांदेड -431601 याप्रमाणे आहे.

 

शिवाजीनगर उप डाकघर निमा भवन, गणेश नगर, नांदेड -431602, सिडको उप डाकघर, शिवाजी पुतळ्याजवळ, राम नगर, सिडको -431603 येथे आहे. इतवारा उप डाकघराचा पत्ता प्रतिभा निकेतन शाळे जवळ, होळी, नांदेड -431604 याप्रमाणे आहे. तरोडा रोड उप डाकघरचा पत्ता भावसार चौक, तरोडा बु. नांदेड -430605 याप्रमाणे आहे. मिलगेट उप डाकघराचा पत्ता एनटीसी मिल जवळ, मिलगेट,नांदेड -431601 असा आहे.

 

सचखंड उप डाकघराचा पत्ता गुरुद्वारा चौक नांदेड -431601 असा आहे. नांदेड टाउन उप डाकघर कार्यालयाचा पत्ता गुरुद्वारा चौक नांदेड -431601 याप्रमाणे आहे. चौफाळा उप डाकघर कार्यालयाचा पत्ता हनुमान मंदिर जवळ, चौफाळा नांदेड -431604 याप्रमाणे आहे. करीमाबाद उप डाकघर कार्यालयाचा पत्ता खोज्जा कॉलोनी रोड कारीमाबाद 431604 याप्रमाणे आहे. नया मोंढा उप डाकघर कार्यालयाचा पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत नया मोंढा नांदेड 431602 याप्रमाणे आहे..

 

अशोकनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता जि. प. शाळे जवळ, वसंत नगर नांदेड -431605 याप्रमाणे आहे. यशवंतनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता यशवंत नगर हाउसिंग सोसायटी, यशवंत नगर नांदेड 431602 याप्रमाणे आहे. चैतन्यनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता कॅनॉल रोड, चैतन्य नगर नांदेड 431605 याप्रमाणे आहे. श्री छत्रपती चौक उप डाकघर कार्यालयाचा पत्ता बजाज फंक्शन हॉल जवळ नांदेड 431605 याप्रमाणे आहे. नागरिकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी आपल्या जवळच्या डाक विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *