कंधार | प्रतिनिधि
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजनेद्वारे शहरी व ग्रामीण भागातील बेघरांना घरे दिले जाते. कंधार शहरातील बेघरांना घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कंधार नगर पालिकेकडून अडवणूक होत आहे. या लाभार्थ्यांची १४ हजार रुपये थकीत आहे. थकित रकमेसाठी वारंवार चकरा मारूनही अद्यापही रकम मिळाली नाही. थकीत रक्कम लाभार्थ्यांना तात्काळ मंजूर करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस अहेमद मेहबूब पठाण यांनी निवेदनाद्वारे नगर पालिका प्रशासनाला दिला.
कंधार तालुक्यातील नागरीकांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून सर्व बेघरांना घरे उपलब्ध करून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना नगरपरिषद कंधार मार्फत राबवत आहे. आवास योजनेसाठी २ लाख ५० हजार रु अनुदान असून, कंधार शहरातील लाभार्थ्यांच्या खात्यात नगरपालिकेकडून १४ हजार रुपये येणे बाकी आहे.
थकीत रक्कम न मिळाल्यास लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन घराचे बांधकाम पूर्ण केले आहे. रक्कम न मिळाल्याने मानसिक त्रास होत आहे.थकीत १४ हजार रु लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
थकित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास वंचीत बहुजण आघाडी कडुन अमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी राम बोरगावकर यांना दिला.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस अहेमद महेबुब पठाण, शहराध्यक्ष सय्यद मोहसीन बागवान, हाजीशाह मौलाशाह, विजय हनमंतराव सोनकांबळे, पठाण शब्बीर दादामीयाँ, देवीदास राजाराम गरुडकर, किशन अनाजी लुंगारे, कुरेशी खदीर बाबामीयाँ, महानंदा नंदकिशोर लुंगारे, सुलतान मौलाशाह पठाण, सय्यद, सय्यद मेहराज जिलानी, सोहेल इसूफ पठान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.