प्रा.डी.सी.पवार यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान

मुखेड -ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथिल रसायनशास्त्र विभागात कार्यरत प्रा.डी.सी.पवार यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडून विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांना या कामी संशोधक मार्गदर्शक म्हणुन विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलात कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक प्रोफे.डाॅ.भास्कर दवणे यांचे Studies on Synthesis and Characterization Of Nitrogen Heterorocycles as Metal Chelates and their Biological Investigation या विषयावर’मार्गदर्शन लाभले.

प्रा.डी.सी.पवार यांनी महाविद्यालयात यु.जी.सी.व रुसा समितीचे प्रमुख म्हणुन कार्य करत आहेत.तसेच नॅक मुल्यांकनात ही त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय संशोधन पत्रिकांतुन संशोधनपर लेख प्रकाशित केले असून विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदा तथा चर्चासत्रा मध्ये ही सहभाग नोंदवला आहे.महाविद्यालयात विभागाकडून विविध कार्यक्रम आयोजनात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.विविध विषयांवरती राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अन्य कार्यक्रमातून व्याख्याने दिली आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे सन्माननीय सचिव प्राचार्य गंगाधरराव राठोड,या विभागाचे विद्यमान आमदार डॉ.तुषारजी राठोड, सहसचिव गोवर्धन पवार, संस्थेचे सदस्य संतोषभाऊ राठोड,मुख्या.गोविंद पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, उपप्राचार्य अरूणकुमार थोरवे,आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.बळीराम राठोड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सौ.अरुणा ईटकापल्ले,प्रा.डाॅ.संजीव रेड्डी,नॅक समन्वयक प्रा.डाॅ.उमाकांत पदमवार, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.नागोराव आवडे,माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे, माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने,प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण,प्रा.डाॅ.वसंत नाईक, कार्यालयीन अधिक्षक श्री रमेश गोकुळे अन्य सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *