विद्यार्थ्यांनो चांगला माणूस बना – प्राचार्य डॉ.दिलीप गवई

मुखेड -शिक्षणाने आपल्यात अपेक्षित बदल झाला पाहिजे. आई वडील व गुरुजनांना आदर द्यायला शिका.आज जागतिक स्तरावर सर्वत्र स्पर्धा आहे. त्याला सामोरे जाणारे शिक्षण घ्या. सर्टिफिकेट कोर्सेस करा. शिक्षण हे आपले ध्येय असले पाहिजे. आम्ही अत्यंत गरिबीतून शिकून इथपर्यंत आलो होतो. केवळ पदवी घेऊन चालणार नाही सोबतच तुम्ही चांगला माणूस बना असे प्रतिपादन सायन्स कॉलेज नांदेडचे प्राचार्य डॉ.दिलीप गवई यांनी ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय, वसंतनगर ता.मुखेड येथे प्रस्तुत महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
अध्यक्षी समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की विद्यापीठ कायदा २०१६ नुसार आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. आता तुम्हाला शिकवलेल्या शिक्षकांसमोर पदवी घेण्याचा बहुमान मिळतो आहे. महाविद्यालयात हा तिसरा पदवी वितरण समारंभ होतो आहे. महाविद्यालयाने तुम्हाला ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याचा फायदा घेऊन तुम्ही येथून पदवी घेऊन जात आहात.पदवी प्राप्त केल्या सोबतच माणुसकीच्या पदवीला विसरू नका.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख प्रा.डाॅ. सुभाष देठे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर प्रा.डाॅ.गुरुनाथ कल्याण व प्रा.डाॅ.महेश पेंटेवार यांनी विद्यापीठ गीत गायन केले. तदनंतर मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्यात कु. तेलंग प्रतीक्षा विठ्ठलराव तिन्ही शाखेतून सर्वप्रथम आल्याबध्दल तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी त्यांचे वडील कै. भोजूराम राठोड स्मृती पुरस्कार देऊन गौरविले. अर्थशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या कु.स्वामी मैनाताई शिवानंद या विद्यार्थिनीला उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे यांच्या वतीने कै. बलभीम थोरवे स्मृती पुरस्कार देण्यात आला. हिंदी विद्यापीठ,वर्धा येथील तंगलवाड यांनी त्यांच्या आईच्या नावे कै. अनुसयाबाई तंगलवाड स्मृती पुरस्कार देऊन महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या कु.मैनाताई शिवानंद या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.इंग्रजी ऐच्छिक विषयात महाविद्यालय सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार या विभागात कार्यरत प्रा.डाॅ. उमाकांत पदमवार यांनी आपली आई वै. शकुंतलाबाई पदमवार यांच्या स्मरणात राठोड राम सूभाष या विद्यार्थ्यांस देवुन गौरविले तर रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक गुण घेणाऱ्या मामीलवाड नागेश देविदासराव या विद्यार्थ्यास या विभागात कार्यरत प्रा.डाॅ.डी.सी. पवार यांनी त्यांच्या आईच्या नावे कै. भुराबाई पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरविले. सदरील पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र, पुष्पहार असे होते.
याचवेळी देशपातळीवर अकराव्या क्रमांकावर २० किमी चालणे या खेळात खेळलेल्या राठोड बिभीषण या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रॉस कंट्री स्पर्धा दहा कि.मी. धावणे विद्यापीठ मध्ये तृतीय क्रमांक पटकाविलेल्या जायभाये ऋषिकेश, बंडेवार तातेराव, राठोड अजय,सिंगनवाड रोहित, जाधव माधव, केंद्रे रोहन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मैदानी स्पर्धा अथलेटिक्स विद्यापीठ बी.झोन मधील लांब उडी तृतीय येणाऱ्या गोपनर अंकुश, 20 किमी चालणे प्रथम आलेला बंडेवाड तातेराव, उंच उडी तृतीय आलेला जाधव निखिल यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बी.एस्सी., बी.कॉम. व बी.ए.च्या ३० पेक्षा अधिक पदवीधरांना पदव्यांचे वितरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रम २०१६ च्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व सोपस्कार पार पाडत संपन्न झाला.
सूत्रसंचलन प्रसिद्ध विभाग प्रमुख प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सौ. अरुणा ईटकापल्ले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परीक्षा विभागातील प्रा.डाॅ. कल्याण जी.एस. प्रा.कोटुरवार पी.पी.,प्रा.जेवळे एस.ए.,प्रा.डाॅ.लोहाळे कविता,प्रा.पांडे जि.के.,रिंदकवाले आर.आर. तसेच कार्यालय अधिक्षक रमेश गोकुळे, विविध समित्यांचे समिती प्रमुख यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावरील प्रा.डाॅ.नागोराव आवडे,प्रा.पांडे जी.के., प्रा.डॉ.मदन गिरी, प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने महाविद्यालय विकास समितीचे प्रा.डाॅ.डी.के.केंद्रे,प्रा.बळीराम राठोड,प्रा.डाॅ.उमाकांत पदमवार,प्रा.डाॅ. लोहाळे कविता,रमेश गोकुळे आदी पुढील रांगेत उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *