काशी यात्रा..
… बनारस , वाराणशी काशी एकच..वरुणाआणि अस्सी या दोन नद्यांमुळे वाराणसी नाव पडले.. बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकलं होतं खुप घाण आहे त्यामुळे जायला नको.. पण दोन आठवड्यापुर्वी आमच्या भगवद्गीता क्लास मधे गंगा स्नानाबद्दल चर्चा सुरु होती.. गंगेचे पाणी घाण दिसुन ते शुध्द का समजलं जातं ??.. ते पवित्र का ?? .. सायंटिफिकली पृव्हन आहे की गंगेच्या पाण्यात कितीही वर्षे ठेवलं तरी किडे होत नाहीत.. शंकराच्या जटेतुन उगम पावुन भगवंताच्या पायाला लागुन वहाणारी नदी पवित्रच असणार ना हे शास्त्र समजलं म्हणुन मी विश्वास ठेवला.. कारण कुठलीही गोष्ट समजुन न घेता , त्याचा अभ्यास न करता मी त्यावर विश्वास ठेवत नाही… मनात इच्छा आली आणि ८ दिवसांत पूर्णही झाली..
भरपुर पैसे असलेल्या लोकांना अशा ठिकाणी जायला मिळेलच असं नाही पण ज्यांना जायला मिळेल ते मात्र नशीबवान असतील कारण पाण्यात उतरताना जराही मनात शंका आली नाही .की पाणी स्वच्छ दिसत नाही कशी उतरु ??. तो फील मी शब्दात मांडु शकत नाही इतका पवित्र होता.. रोज संध्याकाळी घाटावर होणारी गंगारती म्हणजे स्वर्गीय सोहळा होता.. प्रत्यक्षात देव तिथे उपस्थित असल्याचा फील होता..लाखो भाविक त्याचा आनंद घेत होते..
तिथली लोकल मंडळी ही दुधदुपत्यांनी समृद्ध दिसली.. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती.. समाधान होतं…घरचं दुध आणि दुधाच्या पदार्थाची रेलचेल होती.. मी खादाड नाही पण दुधाचे पदार्थ मनापासून आवडतात त्यामुळे भरपुर मलइ असलेले पदार्थ डाएट चा विचार मनात न आणता खाल्ले.दही , लस्सी तर अहाहा.. पेलवान लस्सी फेमस आहे.. दुध एकदम प्युअर , रबडी , बासुंदी , अनेक प्रकारचे चॅट तर एकापेक्षा एक.. कचोडी जिलबी , पुडीभाजी तिथली फेमस .. बाटी चोखा नावाने एक होटेल आहे तिथे तिथलं पारंपरिक फुड मिळतं ते खायला विसरु नका.. संपूर्ण सिटी स्वच्छ आहे आणि लोकल लोकही प्रेमळ ..
सारनाथ हे गौतम बुध्दाचं ठिकाण अतिशय माहीतीपुर्ण आणि सुंदर आहे .. तो संपूर्ण परिसर पहायला फिरायला ४ तास तरी हवेत .. बनारस सिल्क साडीची प्रचंड मोठी रेंज आहे.. साड्या , दुपट्टे , सुट अतिशय सुंदर.. स्ट्रीट शॉपिंग सुध्दा मस्त आहे.. पुण्याहुन बनारस २ तासाचे डिरेक्ट फ्लाइट आहे त्यामुळे घरातुन निघुन ५ तासाच्य आत आपण त्या पवित्र ठिकाणी पोचतो.. प्रवासही सोप्पा आहे..
काशी विश्वेश्वर मंदिराचा प्रचंड मोठा आणि स्वच्छ परिसर पाहुन मी अचंबित झाले… ज्यांच्याकडे पैसे आहेत ते देउन पास घेउन दर्शनासाठी जातात पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते चार चार तास रांगेत उभे रहातात त्यामुळे आपण आपल्या कुठल्याही ओळखीचा उपयोग न करता रांगेत उभे राहुन दर्शन घ्यावे कारण भगवंतासाठी सगळे सारखेच.. पैसा कुठे आणि कधी वापरावा हे आपल्याला समजायलाच हवं… २ तास रांगेत उभे असताना त्या वेळात आपण जप करु शकतो… रांगेत उभे रहाणारे काही भक्त दर्शनासाठी तिथल्या पंडीतजी सोबत किरकोळ वाद घालताना दिसले.. काहीही झालं तरीही तिथे एकही शब्द वेडावाकडा आपल्या तोंडुन निघणार नाही याची काळजी घ्यायची कारण पवित्र भुमीत जाऊन आपल्या हातुन काहीही वाईट घडणार नाही याची काळजी घ्यायची.. फक्त तिथेच नाही तर कुठेच कधीही आणि कोणाबाबतही आपण चुकीचं वागणार नाही तर आणि तरच यात्रा केल्याला महत्व आहे…
पितृपंधरवड्यात जायचा योग आला आणि घाटावर माझ्या हाताने मला माझ्या पुर्वजांसाठी पुजा करता आली हे अजूनच सुंदर होतं.. माझ्या मित्राने पैसे देउन त्याच्या पुर्वजांसाठी पुजा करायला सांगितली होती आणि ते माझ्या हातुन घडावं हे तर कल्पनेपलिकडील होतं.. काय योगायोग असेल, काय नातं असेल आणि मी तिथे असताना जाणवलं की मी इथे या आधी अनेकदा येवुन गेले आहे .. भारावुन टाकणारी भुमी आहे इतकच मी सांगेन..
Be a good person
Not a rich person..
सोनल गोडबोले