शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषध व यंत्र सामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता प्रदान

 

▪️जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम, मनपा यांना समन्वयाच्या दिल्या सूचना

▪️खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीला उपलब्ध

नांदेड :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या दैनंदिन भेटीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करून तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व मनपा यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनासमवेत परस्पर समन्वय साधून दिला असून आपआपली जबाबदारी व कर्तव्य काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने येत्या काळात काही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यावर यशस्वी नियोजन करता यावे यादृष्टिने औषध व यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त प्रशासकीय मान्यता देऊन ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून खाजगी डॉक्टर्स व परिचारिका अतिरिक्त मदतीसाठी उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून दररोज 800 ते 1 हजार या संख्येच्या मर्यादेत रुग्ण उपचार घेत आहेत. अतिगंभीर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून गत 3 दिवस दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये जे अति गंभीर आजारी असेलेले रुग्ण आहे त्यांचा मृत्यू दर 0.7 टक्क्याहून कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *