( कंधार ;एस.पी.केंद्रे )
कंधार तालुक्यातील चौकी धर्मापुरी येथील तरुण शेतकरी संतोष बालाजी कळकेकर वय ३५ वर्षे धंदा शेती यांनी सततची नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतातील गोंदणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे चौकी धर्मापुरी गावात शोककळा पसरली आहे.
मयत संतोष बालाजी कळकेकर यांचे वर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारूळ, या बँकेचे ७० हजार रुपये थकीत कर्ज होते, कर्ज थकीत असल्यामुळे यावर्षी त्यांना नवीन कर्ज मिळाले नाही, गतवर्षी उधार उसनवारीवर घेतलेले कर्ज व सततची नापिकी आणि यावर्षी पाऊस बऱ्यापैकी झाला नसल्यामुळे शेती पीक म्हणावे तसे आले नाही, त्यामुळे गतवर्षी घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते गत काही दिवसापासून होते.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवारी सकाळी अंदाजे १०:३० वाजताचे सुमारास आपल्या शेतातील गोंदणीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, मयत संतोष कळकेकर यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा व १ मुलगी असा परिवार आहे.
मयताचा पुतण्या परमेश्वर शिवाजीराव कळकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ४४/२०२३ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे दाखल करून,पोलीस निरीक्षक उदयकुमार खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार आर.यु.गणाचार्य व पोहेकॉ व्यंकट पाटील हे पुढील तपास करत आहेत,