नांदेड : प्रतिनिधी
अन्न वाया न जाता खऱ्या गरजूंना अन्नदान करण्यासाठी सूरू केलेल्या ” भाऊचा माणूसकीचा फ्रिज ” ला एक वर्ष पूर्ण झाले असून वर्षभारत तब्बल २५०००० पेक्षा जास्त डब्याचे वितरण करण्यात आले असून अन्नदान चळवळीच्या दुसऱ्या वर्षाची नोंदणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी एक वर्षांपूर्वी म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ पासून हा नवीन उपक्रम पंचवटी हनुमान मंदिर,महावीर चौक, नांदेड येथे सुरू केला होता.गेल्या वर्षी ज्या दिवशी अन्नदाते मिळाले नाहीत त्या दिवशी सूचना केल्यानंतर प्रसिध्द उद्योजक नवलकिशोर गुप्ता,प्रा.के.एच. दरक, बलबिरसिंह ठाकूर,चंद्रकांत गंजेवार,शांता विष्णुगोपाल काबरा,उपेंद्र मुळावेकर,साईनाथ उत्तरवार,डॉ.प्रणद जोशी, स्नेहलता जयस्वाल,रागिणी जोशी यांच्या सह अनेकांच्या सहकार्याने या उपक्रमात एकही दिवस खंड पडलेला नाही. दररोज किमान ४० ते १२० डबे अन्नदात्यांच्या हस्ते वाटप करण्यात येतात. याशिवाय अनेकांनी आपल्या घरातील शिल्लक राहिलेले अन्न फ्रिजमध्ये आणून ठेवल्यानंतर गरजूंना वाटप करण्यात आले आहे.ज्यांना खरोखर अन्नाची गरज आहे अशा व्यक्ती दररोज सकाळी दहा वाजता फ्रीज जवळ रांगेत बसलेले असतात. गरजूंना अन्नदात्यांच्या हस्ते डबे वितरित करण्यात येतात.या फ्रीज मध्ये कोणीही अन्नदाते खाद्य पदार्थ ठेऊ शकतात आणि कोणीही गरजू मोफत घेऊ शकतात.
आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसा निमित्त अथवा स्मृतीप्रित्यर्थ जेवणाचे डबे अथवा इतर खाद्यपदार्थ दयायचे असतील तर त्यांनी ९४२१८ ३९३३३ वर गुगल पे अथवा फोन पे द्वारे ₹ २००० भरून संपर्क साधावा. त्यादिवशी सकाळी १० वाजता त्या अन्नदात्यांच्या हस्ते ४० जेवणाचे डबे फ्रीजमध्ये ठेवून गरजूंना वाटप करण्यात येतात.त्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाळीस हजार लोकांपर्यंत व्हायरल केले जातात.एका दिवशी जास्तीत जास्त तीन दानशूर नागरिकांना अन्नदान करता येते. गेल्या वर्षी फ्रिज बसवण्यासाठी सुदाम नगारे,एल.के. कुलकर्णी सर,सतीश सुगनचंदजी शर्मा,सुरेश लोट,विश्वजीत मारोती कदम धानोरा,सौ. वनिता शिवाजी शिंदे इस्लामपूर,मोहीत जयप्रकाश सोनी,उपेंद्र मुळावेकर,संजय उत्तरवार,सिद्राम दाडगे,अर्जुन दमाम,वंसा देशमुख,राजेंद्र दमाम,व्यंकटेश कवटेकवार,नरेश सोमाणी,शशिकांत देशपांडे बाऱ्हाळी,वंदना प्रभाकर कुलकर्णी यांनी सहकार्य केले होते. पंचवटी हनुमान मंदिराचे अनिलसिंह हजारी,सरदार संजीवसिंघ नील,सुधीर देबडवार यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभुदास वाडेकर,अरुणकुमार काबरा,राजेशसिंह ठाकूर,सविता काबरा, विजय वाडेकर,सुरेश शर्मा,विलास वाडेकर, कामाजी सरोदे, सुरेश निलावार , संतोष देशमुख यांनी परिश्रम घेतले.दुसऱ्या वर्षात आपणाला हवी असलेली तारीख सुनिश्चित करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.