कंधार ; प्रतिनिधी
दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता अद्यासि आधिकारी माननीय राम बोरगावकर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कंधार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच सखुबाई मारुती वारकड यांच्यावर 10 ऑक्टोबर 2023 रोजी अविश्वासाचा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल केला होता त्यावर चर्चा करण्यासाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते त्या सभेमध्ये सहा सदस्य उपस्थित होते एक अनुपस्थित सदस्य होता त्यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने सहाच्या सहा म्हणजे ज्यांच्यावर हा अविश्वास दाखल केला होता
त्यांनी सुद्धा अविश्वास ठरावाच्या बाजूनेच मतदान दिले आणि अशा पद्धतीने हा ठराव पारित करण्यात आला गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये गावांमध्ये अतिशय कोणालाच न जुमानता अरेरावीची भाषा वापरून मीच सरपंच आहे अशा अविरभावात वागणाऱ्या या उपसरपंचाचा पती आणि उपसरपंच यांना आता गाव कंटाळला होता .
यांना कधी काढता याची वाट बघत होते अखेर ग्रामपंचायत सदस्यांनी विचार करून सरपंच चंद्रभागाबाई कटकमोड, सदस्य दुर्गा कुकुलवाड ,सदस्य गोदावरी बाई कुंभारे, प्रल्हाद घुमे, सुभाष सपुरे यांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला त्यावर चर्चा झाली आणि पाच च्या जागी ज्यांच्यावर अविश्वास घेतला त्यांनी सुद्धा यांच्याच बाजूने मतदान करून ते आज पायउतार झाले याप्रसंगी ग्रामसेवक तलाठी निवडणूक विभागात काम करणारे थोटे साहेब यांच्यासह लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते आणि गावातील मोठ्या संख्येने तरुण वर्ग हा अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित होता ग्रामपंचायतचे सदस्य प्रल्हाद घुमे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला