वाचन संस्कृतीतूनच माणूस विद्या संपन्न बनत असतो.एखाद्या व्यक्तीला वाचनाचे आवड नसेल तर जुनाट परंपरा,अज्ञान,अंधश्रद्धा,वेडगळ समजुती यात माणूस गुरफटून जातो, वाचनाच्या अभावामुळे माणसाचे वर्तन अडाणीपणाचे असते, जर आपण वाचन नाही केले तर वाचन संस्कृती नष्ट होते, की काय? अशी शंका येत आहे ,
म्हणून आज जाणीवपूर्वक वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे.
भारतीय संस्कृतीत ग्रंथाचे स्थान गुरुस्थानी आहे.
*इतिहास वाचा मिळे दिव्यदृष्टी*
*न वाचता राष्ट्र हे दुःखी कष्टी*
*जशी दिव्यदृष्टी निळे संजयाला*; *तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला।*।राष्ट्राची खरी संपत्ती त्या राष्ट्रातील संपत्ती वरून नव्हे तर ग्रंथावरून कळते.असे एका ठिकाणी म्हटलेले आहे, ग्रंथांचे आदरपूर्वक पूजन केले पाहिजे, ज्ञान समृद्धीसाठी आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही, वाचनातून अनेक विचारवंत,तत्त्वज्ञ,संत जन्माला आले,त्यांना लाभलेल्या दिव्यदृष्टीतून आपल्या देशाचा विकास झाला.राष्ट्र समृद्ध झाले. त्यांच्या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली. स्वतःला राष्ट्राच्या उन्नतीसाठी झोकून दिले. त्यामुळे वाचन संस्कृती डोळसपणे आपण जोपासावी .
असेच महान संशोधक भारतरत्न डॉ, ए,पी,जे ,अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो, त्याची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत. डॉ.ए,पी,जे अब्दुल कलाम यांचा जन्म15 ऑक्टोंबर 1931 रोजी भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाबद्दिन अब्दुल कलाम होते.
अतिशय
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द त्यांनी ठेवली त्यांच्या जीवनावर त्यांच्या आई-वडिलांचा प्रभाव पडलेला होता वडीलांकडून प्रामाणिकपणा तर आईकडून स्वयंशिस्त व दयाळ वृत्ती त्यांनी शिकली, त्यांना गणित विषयाची फार आवड होती, बहिणीचे दागिने गहाण ठेवून त्यांनी ‘नासा’ तील शिक्षण पूर्ण केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या’अग्नी’ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर त्यांचे फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगात कौतुक झाले. म्हणून ते म्हणतात *स्वप्न ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो ,स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत* डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांची कामगिरी पाहून त्यांचे कौतुक केले. काही काळ पंतप्रधानाच्या वैज्ञानिक सल्लागाराचे काम ही त्यांनी केले .10 जून 2002 मध्ये राष्ट्रपती पदासाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले.आणि ते राष्ट्रपती तिन्ही दलाचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली, 8 जून 2006 ला सुखोई या ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या अत्याधुनिक लढा विमानातून अर्धा तास त्यांनी उड्डाण केले. त्याचा ताशी वेग 1500 कि मी आहे; या विमानातून प्रवास करणारे ते पहिले राष्ट्रपती आहेत,आपण 21व्या शतकात आणि विज्ञान युगात वावरत असलो तरी समाजातील आणखीही वाचकांची संख्या वाढलेली नाही असे मला वाटते. जोपर्यंत वाचनालयाकडे मनुष्याच्या रांगा लागणार नाहीत; तोपर्यंत आपण सुधारणार नाही, कारण वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो. श्रद्धा जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरी असते, तेव्हा त्यावरचा विश्वास अधिक दृढ होतो,वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शास्त्रीय संशोधनाच्या आधारे आपण एखाद्या संशोधनात गरुड झेप घेऊ शकतो, म्हणून वाचन अतिशय महत्त्वाचे आहे, समाजात जेव्हा आपली सदसद्विवेकबुद्धी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करते तेव्हा वाचनाचे सार्थक झाले अशी आपणाला म्हणता येईल, *यशस्वी कथा वाचू नका ,त्यांनी केवळ संदेश मिळतो ,अपयशाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात* वर्तमानपत्रातून कात्रणे संग्रहित करणे, ग्रंथालयातून पुस्तका आणून वाचणे, त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो. वाचनाचे अतिशय महत्त्वाचे आहे , असे ते म्हणतात ,सातारा जिल्ह्या मधील भिलार नावाचं गाव आहे त्यांना पुस्तकांचे गाव म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते .कारण पुस्तक ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. वाचाल तर वाचाल असे म्हणतात.
म्हणून ग्रंथ हेच आपले गुरु असतात ,ते आपल्या जीवनाला दिशा देतात म्हणून वाचन करा त्यातून ज्ञान मिळवा आणि त्याचा फायदा इतरांना सुद्धा द्या म्हणजे आपला देश महासत्ता होईल डॉ, कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्यात आलेल्या पाचही प्रभावी क्षेपणास्त्रे आहेत, त्रिशूल, आकाश, नाग, पृथ्वी आणि अग्नी, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असे म्हणतात. स्विझर्लँड मध्ये डॉ.अब्दुल कलाम ज्या दिवशी गेले होते तो दिवस *विज्ञान दिन* म्हणून तेथील सरकारने जाहीर केला आहे; हे एवढे मोठे कार्य करणारे महान व्यक्ती असल्यामुळे भारतातील 38 विद्यापीठांनी त्यांना मानाची डॉक्टरेट ही पदवी बहाल केली
, आपल्या देशातील बरेच लोक आज्ञानामुळे मागे पडले आहेत परंतु सुधारलेले लोक पाहिले तर अतिशय कमी आहेत, वाचनामुळे आपणाला खरे -खोटे विश्वास -अविश्वास ताबडतोब कळतात, म्हणून वाचनामध्ये भरपूर शक्ती आहे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी घर बांधले होते हे सर्वांना ज्ञात आहे . तसेच डॉ कलामनी एकूण 24 पुस्तक लिहिले, त्यातील विंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020 ए व्हिजन फाॅर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स ही पुस्तके प्रसिद्ध आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1981 मध्ये पद्मभूषण 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार *भारतरत्न* देऊन सन्मानित केले आहे, डॉ. अब्दुल कलाम यांनी आपल्या भरीव कामगिरीने उत्तम बुद्धिमत्तेने आणि विनम्र स्वभावाने देशातील आपल्या भावी पिढीसाठी उत्तम आदर्श ठेवला आहे. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचा स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,
विज्ञानाचा परमभोक्ता, युवकांना सदैव प्रेरणा देणारे ,भारताचे माजी राष्ट्रपती, विख्यात अणुशास्त्रज्ञ, हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी, मनस्वी वृक्षप्रेमी या अनेक उपाध्यांनी त्यांना ओळखले जाते ,त्यांची कमतरता भारताला सदैव जाणवत राहील ती भरून काढण्यासाठी 15 ऑक्टोबर हा जन्मदिन भारत सरकारने वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करीत आहे, वाचन संस्कृती वाढवून आपण ही मोठे व्हावे हीच अपेक्षा.. जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
*शब्दांकन*
*प्रा .बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड