महाविकास आघाडीच्या नेत्याच्या विरोधात भाजपच्या वतीने कंधार येथे आंदोलन

 

कंधार ; प्रतिनिधी

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, यासाठी भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीने महाराणा प्रताप चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले

 

भारतीय जनता पार्टी कंधार च्या वतीने दिनांक २१ रोजी महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सकाळी ११ वाजता
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी व सेना या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात घोषणा दिल्या सन २००० ते २०१४ पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये कंत्राटी नोकर भरती ची सुरुवात झाली २०१० ते २०१४ पर्यंत कंत्राटी पद्धतीने नोकर भरती झाल्याचे यावेळी प्रामुख्याने सांगण्यात आले त्याचबरोबर २०२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाह्य एजन्सीला कंत्राटी नोकर भरतीचे टेंडर दिले एवढेच नाही तर हे टेंडर पंधरा वर्षासाठी त्यांना देण्यात आले व २०२२ मध्ये या टेंडरला मान्यता देण्यात आली हा सर्व प्रकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये झाला व कंत्राटी भरतीचे जनक प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच आहे परंतु या सगळ्या प्रकार भाजपाच्या व महायुतीच्या माथी मारण्याचं प्रयत्न महाविकाआघाडीच्या नेत्याकडून होत आहे

 

या निषेधार्थ भाजपच्या वतीने करणारे आंदोलन करण्यात आले व या कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात तो रद्द करण्याचा शासन आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष किशनराव डफडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, माजी उपनगराध्यक्ष जफरोदीन, गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर डांगे,निलेश गौर,साईनाथ कोळगीरे,चेतन केंद्रे, दत्तात्रय चंदनफुले,व्यंकट नागलवाड,राजकुमार कोकाटे,सागर डोगरजकर,राजु लाडेकर, शंकर कोंके, बाबुराव चाटे, भाऊराव कल्याणकर, सदाशिव नाईकवाडे, बालाजी पवार,हनमंत डुमणे, सुभाष घुमे, बाबुराव घुमलवाड, अविनाश गिते, शंतनु कैलासे, बाळासाहेब गर्जे, शामराव वाडीकर, शेख फारूक ,बाळू धुतमल, शामसुंदर शिंदे यांच्या सह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *