कंधार ( दिगांबर वाघमारे )
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्रशिक्षण देण्याबाबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे दिनांक 12 मे 2023 च्या आदेशानुसार कंधार तालुक्यातील सर्व योजनेअंतर्गत 262 शाळांमधून काम करत असलेल्या 450 स्वयंपाकी तथा मदतनीस यांना प्रशिक्षण कंधार येथील गटसाधन केंद्र येथे झाले असल्याची माहिती अधीक्षक सुरेश जाधव पाटील यांनी दिली .
प्रशिक्षण देण्यासाठी श्री ऍनालिटिकल टेस्टिंग अँड रिसर्च लॅबोरेटरी यांचे मार्फत आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरेश जाधव पाटील अधीक्षक वर्ग 2 शालेय पोषण आहार पंचायत समिती कंधार यांनी गटसाधन केंद्र कंधार येथे ही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यशाळेसाठी एकूण 350 पेक्षा जास्त स्वयंपाकी तथा मदतीने हे उपस्थित राहिले. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना जळगाव येथिल ट्रेनर कुमारी रसिका राऊत यांनी ट्रेनर म्हणून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले.
त्यांनी वैयक्तिक स्वच्छता,धान्यसाठा ग्रहाची स्वच्छता, शालेय पोषण आहार शिजवत असताना घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी यांना माहितीचे बुकलेट नोटपॅड व पेन देण्यात आले. महिनाभराच्या अंतराने शाळा स्तरावर त्यांना एप्रोन पोहोचवणार असल्याचे कुमारी रसिका राऊत मॅडम यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी श्री सुरेश जाधव अधीक्षक वर्ग 2 शालेय पोषण आहार पंचायत समिती कंधार, श्री मोरे केंद्रप्रमुख बहादरपुरा केंद्र, तसेच राजू बोरीकर डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी महत्त्वपूर्ण काम केले.