हा शोध माझ्या मित्राने लावलाय मी फक्त तो शब्दातीत करतेय.. त्या त्याच्या बोलण्यात किवा सांगण्यात पण रोमान्स होता. गम्मत होती आणि नात्यातील गोडवा होता.. कोणीही कमी नसतं पण नातं काय आहे त्यानुसार त्याची गणितं बदलतात.. नवराबायकोत येणारा रोजचा पण नित्य नवा संवाद संसारी होत जातो. कधी कधी तो रटाळवाणा होतो , तरीही तो करावा लागतो कारण तो संसार असतो.. सुरुवातीला लव्हमॅरेज असेल तर बाबु शोन्याचा नंतर घरगडी होतो आणि अरे तुरे वरुन हांबरीतुंबरीवर येतो तरिही गाडी ढकलस्टार्ट करत सुरुच ठेवावी लागते नाहीतर तिला गंज चढायची भिती असते.. अरेंज मॅरेज तर मज्जाच वेगळी .. सगळा कारभार अहो ने सुरु होतो आणि wp वर येताना भाजी आणा , किराणा आणा , आज मंडइत जायचय हा लवकर या..
रविवारी नंणदेने जेवायला बोलावलय . परवा चुलत दिराने काहीतरी ठरवलेलं असतं .. त्यामुळे अहो चं ओझे उचलणारं गाढव होतं .. पण ते लव्ह मॅरेज मधे अरे ये गाढवा असं असतं आणि अरेंजमॅरेज मधे गाढव सोफीस्टीकेटेड रुपात ( अहो ) मधे असतं.. मग त्या बिचाऱ्या गाढवाना कोणीतरी हळुवार फुंकर घालतं आणि गाढवाचा पिसारा फुलवणारा मोर होतो..
जी फुंकर घालते ती कुठल्या तरी …… ची बायकोच असते कारण तीलाही मोराची चाहुल लागलेली असते.. तिला तो मोर तिच्या मनात हृदयात नाचायला हवा असतो.. तो व्यायाम करायला लागतो , छान राहायला लागतो.. स्वतःतलं एक पीस काढुन तिच्या कंबरेवर , पाठीवर फिरवायला लागतो .. घरी जाड कंबर पाहुन वैतागलेला तो इथे तिच्या कर्व्हवर प्रेम करतो.. कारण बदल हेच त्यामागचं कारण असतं .. हे आणा ते आणा या मेसेजेस ने वैतागलेला तो इथे मात्र लाल हार्ट पाहुन आतुन बाहेरून लाल गुलाबी होतो….Love you किवा तु रोमॅन्टिक आहेस असे मेसेजेस यायला लागतात त्यामुळे त्याचा पिसारा अजुन फुलतो .. एकीकडे पोटाचा पसारा त्याला आवरतं घ्यावं वाटायला लागतो.. ही बायको का नाही झाली असही तो मनोमन म्हणतो.. पण गाढवा ती बायको झाली असती तर तिथेही हीच परिस्थिती झाली असती .. जी सुंदरी तुझ्याकडे आहे ती कोणाची तरी बायकोच आहे.. काय भाऊ दुनिया गोल है.. आणि हमारा विषय खोल है! ..
सहज तो बायकोचे मेसेज पहातो आणि पडल्या पडल्या त्याच्या सखीच्या मेसेजेस ना क्लीक करतो..मनातच म्हणतो दोन्ही स्त्रीयाच , पण फरक किती ना…प्रेयसीचे मेसेजेस त्याला गुदगुल्या करतात आणि बायकोचे काटेरी झुडपासारखे टोचतात.. बायकोशी एकही शब्द बोलु वाटत नाही पण इथे तासनतास गप्पा आणि तरीही म्हणतात करमत नाही..
How romantic ना असं मलाही म्हणावं वाटतय.. एक हृदयात बसते आणि दुसरी बाहेर घिरट्या घालते… बायकोसोबत खरेदीला जाताना त्याला प्रेयसी आठवते आणि प्रेयसी सोबत डेट ला जाताना बायकोने घरी जाताना काही आणायला तर सांगितले नाही ना म्हणुन मेसेजेस कडे लक्ष जाते.. प्रेम तो दोघींवर ही करतो पण जरा जास्त कल प्रेयसीकडे असतो .. असच प्रेम आपल्या बायकोवरही कोणीतरी करत असेल या कल्पनेने त्याचं ढाबं दणाणतं आणि तिथे आडवा येतो तो पुरूष असतो.. नवरा आणि प्रियकर बाजूला जातो आणि उरतो तो फक्त आणि फक्त ओझी वहाणारा…..
. life is beautiful.. प्रेयसी नाही तर मज्जा नाही.. बायकोची प्रेयसी होवु शकते पण बाहेर चोरून भेटण्याची मज्जा काही वेगळीच असते.. मैत्रीण वेगळी आणि प्रेयसी वेगळी बरं का मित्रांनो..
मैत्रीणीला मैत्रीणच ठेवा नाहीतर प्रेयसी नावाची इंगळी कधी नांगी मारेल याचा भरोसा नाही..
मग पुन्हा घरात आणि बाहेर रामायण सारखच .. रामायणात पण नावीन्य हवच की.. माझ्या मित्राला सांगेन.. दोन्ही नाती तितकीच सुंदर आहेत.. दोन्ही जप आणि विशेष म्हणजे त्या नात्याकडे पहाताना चष्मा मात्र गुलाबीच असुदेतकारण आपण प्रेमाचे भुकेले आहोत.. बियॉन्ड सेक्स वर वाचक का प्रेम करतात त्याचं कारण हेच आहे.. दोन्हीकडे बॅलन्स आहे..
दोन्हीकडे रोमांस आहे.. दोन्हीकडे आपण सगळेच आहोत..
कारण तुमचं आमचं सेम असतं..
सोनल गोडबोले