आजपर्यंत कधीही मी या विषयावर लिहीलं नाही .. मी किवा आपण सगळे फौजींचा खुप आदर करतो.. आपण घरात दिवाळी साजरी करत असतो तेव्हा ते काम करत असतात किवा गुलाबी थंडीत आपण ब्लॅंकेट घेउन झोपतो तेव्हा ते सीमेवर असतात.. स्वतःचा वाढदिवस असो कि मुलांचा ते ड्युटी सांभाळत असतात.. स्वतःची ॲनीव्हरसरी ते सीमेवरच करतात.. घरी संपूर्ण कुटुंब त्यांच्या येण्याकडे डोळे लावुन बसलेले असते.. कधी त्यांची सुट्टी कॅंन्सल होते तर कधी ठरलेल्या वेळेच्या आत कामावर रुजु व्हावे लागते हे सगळं चित्रपटातुन पाहिलय ,,ऐकलय किवा वाचलय… मला वैयक्तिक यांच्या जीवनाबद्दल काहीही माहीत नाही कारण माझा एकही नातेवाईक या क्षेत्रात नाही..
एकही मित्र यामधे नाही पण माझे अनेक वाचक फौजी आहेत.. आम्ही अनेक पुस्तके जम्मु ला पाठवली आहेत…अनेकजण माझे यूट्यूब चॅनल फॉलो करतात.. लैगिकतेवर त्यातुन त्यांना मार्गदर्शन होते .. ही एक प्रकारची माझ्या हातुन सेवा होतेय हे मला काल जाणवलं.. त्यांना insta , facebook .. वापरायला परवानगी नाही हे मला काल समजलं..त्यांची मानसिक ,,शारीरिक गरज , त्यांची रहाण्याची सोय काय असते , आहार काय असतो हे काल समजलं आणि वाटलं आज यावरच लिहावं.
माझे फौजी वाचक जे जम्मुला आहेत.. त्यांनी माझी पुस्तके वाचली आहेत आणि यूट्यूबवरचे लैगिकतेवरचे व्हीडीओ पाहिले आहेत.. त्यांना लैगिकतेवर काही समस्या होत्या म्हणुन काउंसीलींग साठी माझ्याकडे संपर्क केला.
व्हीडीओ कॉलवर त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या शारीरिक गरजा , मानसिक गरजा , तिथलं हवामान , सहा महिन्यानंतर ते त्यांच्या बायकोला भेटतात तेव्हा त्या दोघांना शारीरिक संबंधांना कसं सामोरे जावे लागते .. त्यांनाही त्या थंडीत बायकोची आठवण येते, त्यांनाही तिच्या मिठीत जावं वाटतं.. पण संपूर्ण जगाला हा आनंद देताना ते त्यांच्या भावना मारुन टाकतात.. काउंसीलींग झाल्यावर मी त्यांच्या रहाण्याच्या जागेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पत्र्याची घरे आहेत .
मग मी विचार केला त्या घरात त्यांना किती थंडी वाजत असेल .. १२-१४ तास काम करुन त्यांच्यात काय ताकद रहात असेल.. त्यांना बाबा व्हायचय मग त्यासाठी तयार होणारं वीर्य हे हेल्दी हवं म्हणजेच आहार उत्तम हवा त्यासाठी त्यांची मानसिक स्थिती उत्तम हवी.. दोघांनाही शारीरिक सुख हवे तर हस्तमैथुनाबद्द्ल अनेक गैरसमज त्यांच्या मनात आहेत त्यासाठी लैगिक शिक्षणाची गरज आहे.
एकत्र कुटुंबात असलेली बायको जी कोणाशी बोलूही शकत नाही तिची काय घुसमट होत असेल याची कल्पनाही न केलेली बरी.. तिचं मानसिक आरोग्य उत्तम नाही.. सहा महिन्यानंतर इंटरकोर्स केल्यावर तिच्या व्हजायनाला त्रास होतो कारण इतकी मोठी गॅप होते .. अशा अनेक समस्यांना या लोकांना सामोरे जावे लागते याचा अंदाज मला काल आला आणि खूपच वाईट वाटलं… आपण इतक्या लाखाचे फटाके उडवले, धुराचा त्रास झाला , प्रदूषण झालं पण अनेक जवान त्यांच्या छातीवर अनेक गोळ्या ( मग त्या मिसाइल मधल्या असतील किवा कुटुंबापासुन दुर राहिल्यामुळे मानसिक आरोग्याच्या असतील ) झेलुन , डोळ्यात तेल घालुन पहारा देत असतात याचा आपण विचारही करत नाही..मी आजपासुन रोज देवासोबत त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करायला हवी हेही प्रकर्षाने जाणवलं.
आपण स्वतःपुरता किती संकुचित विचार करतो हे आज प्रकर्षाने जाणवलं आणि आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागणार हेही जाणवलं अर्थातच चांगल्या अर्थाने कारण तीही सेवा आहे आणि आपण करतो तीही सेवाच आहे..
प्रत्येकाने नेमुन दिलेलं काम चोखपणे करणं हेच आपलं धेय्य असायला हवं हेही मनोमन पटलं.. माझ्या वाचकांमुळे व्हीडीओत का होइना मला तिथला परिसर पहाता आला आणि त्यांच्याबद्दल जाणुन घेताही आलं.. आपण सगळेच कायम त्यांच्या ऋणात राहुयात आणि सीमेवर काम करणाऱ्या प्रत्येक जवानासाठी प्रार्थनाही करुयात.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi