कंधार शिवारात शॉर्ट सर्किटमुळे  ४ एकर क्षेत्रावर असलेला ऊस जळून खाक :शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

कंधार : प्रतिनिधी

        कंधार शिवारात ४ एकर क्षेत्रावर असलेले ऊसाचे डि.पी. मधुन शार्टसर्किट होऊन विद्युत प्रवाहामुळे शेतामध्ये असलेल्या खांभामध्ये स्पर्श होऊन ऊसाचे पीक भस्मसात झाले. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

      कंधार शहरातील अब्दुल नईम महंमद सरवर रा. छोटी गल्ली कंधार येथील रहिवासी सांगडे सुलतान मुश्किल आसान दर्ग्याचा कायदेशीर व्यवस्थापक असून सदरील दर्ग्याच्या मालकीची असलेली शेत जमीन ज्याचा शेत सर्वे क्रमांक ७/२ असून या शेत जमिनीमध्ये दर्गा प्रशासनाकडून मागील ८ ते १० वर्षापासून वाहिती करतो. ४ एकर क्षेत्रावर ऊस हे पीक घेतले असुन २० रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास माझ्या शेता समोर असलेल्या डी.पी. मधून शार्ट सर्किट होऊन माझ्या शेतामध्ये असलेले विद्युत प्रवाह खांभामध्ये स्पर्श होऊन माझ्या शेतातील जवळपास ४ एकर क्षेत्रावर असलेले ऊसाचे पीक भस्मसात झाले. या संपूर्ण प्रकरणाची जाय मोक्यावर येऊन चौकशी करून नुकसान झाल्याची भरपाई मिळावी यासाठी आज याबाबतचे निवेदन तहसीलदार, महावितरण व पोलीस निरीक्षक कंधार यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *