कंधार मराठी पत्रकार संघाच्या आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा प्रतिसाद 

 

कंधार, ( दिगांबर वाघमारे)

 मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिना निमित्त कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात आरोग्य तपासणी करुन घेत पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

                 3 डिसेंबर मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन राज्यात प्रति वर्षी पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील सर्वच पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी केल्या जाते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विस्वस्थ एस.एम.देशमुख यांच्या सुचने नुसार व मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शना खाली. कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ही तालुका अध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य तपासणी साठी शिबीर घेण्यात आले. कंधार ग्रामीण रुग्णालय परिसरात दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

                 मराठी वृत पत्र सुष्टीचे जनक बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे, डॉ.महेश पोकले, डॉ.संतोष पदमवार, जेष्ठ पत्रकार रमेशसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

 

                    या शिबिरात शुगर, बीपी, ईसीजी, दंत तपासणी, एक्सरे तसेच सर्वच प्रकारच्या रक्ताची तपासणी (ऑल टेस्ट) करण्यात आल्या. या शिबिरास पत्रकारांनी उत्सपूर्त प्रतिसाद देवून तपासण्या करून घेतल्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष एन.डी.जाभाडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य गंगाप्रसाद यन्नावार, तालुका कार्यकारणी सदस्य विश्वभर बसवंते, दयानंद कदम, मारोती चिलपीपरे, संभाजी कांबळे, हबीब, माधव भालेराव, महंमद सिकंदर, मुरलीधर थोटे, एस.के.गायकवाड, एस.पी.जाधव आदी पत्रकारांनी व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *