भटकंती

 

निरोगी मन आणि निरोगी शरीर रहाण्यासाठी आपण उत्तम आहार घेतो ,व्यायाम करतो यासारख्या अनेक गोष्टी करतो पण जो निसर्गात जातो , फिरतो त्याची त्वचा जास्त ग्लो करते.. ती व्यक्ती कायमच आनंदी आणि निरोगी रहाते.. नाहीतर बॅंकेत करोडो रुपये आहेत पण घरातुन बाहेर पडायची इच्छा नसते असेही अनेक लोक आहेत.. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असल्या तरीही निरोगी रहाण्याच्या जवळपास सारख्याच आहेत कारण तेच परिमाण आहे.. म्हणुन शेतकरी किवा खेड्यात रहाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते..

मोकळी हवा.. सुर्यप्रकाश , प्राणी , पक्षी , झाडे ,फुले हे फक्त आणि फक्त निरोगी मन आणि निरोगी तन ठेवतात.. आपण प्रत्येकवेळी निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करुन निसर्गात हिंडायलाच हवं.. प्रत्येक ऋतु नुसार ते सौंदर्य बदलतं आणि बदलणाऱ्या सौंदर्यासोबत आपणही अजूनच तरुण आणि खुश रहातो.. यासाठी पैसा लागत नाही असं मी अजिबात म्हणणार नाही पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी या सुखाला अजिबात दुर लोटु नये… डोंगर दऱ्या कपारी दगड माती अगदी एखादं काटेरी रोपटं ही जेव्हा आपल्याशी संवाद साधतं ना तेव्हा आपण त्यांच्यापुढे खूपच छोटे आहोत याची कल्पना येते..

आपली positive vibrations ही त्यांना कळतात आणि त्यानुसार निसर्ग रीॲक्ट होतो… negative vibrations ही प्राणी पक्षी यांनाही कळतात आणि त्यानुसार ते आपल्या जवळ यायचं की नाही ठरवतात… कुठल्याही प्राणी पक्ष्यात भगवंताचा अंश असतो म्हणुन त्याला हडतुड करु नये.. निसर्गात जाताना चांगल्या विचाराने आणि चांगल्या मनाने गेलो तर निसर्ग आपल्याला तेवढीच साथ देतो.. अगदी उन्हाळ्यातही पाऊस पडलाय हे मी अनेकदा अनुभवलय..

कारण मला पाऊस आणि पाणी आवडतं .. पावसाळ्यात मढे घाटातला एक किस्सा मी शेअर केला होता तो पुन्हा करते..
आपण कल्पना करणार नाही इतकं आपल्याला दिलं जातं.. जुलै मधे सलग आठवडाभर पाऊस नव्हता..त्याचवेळी आम्ही मढे घाटात जायचा प्लॅन केला होता…

धबधब्यापासुन ४ किलोमीटरवर जाईपर्यंत पाऊस नाही आणि आम्ही पोचल्यावर पाऊण तास इतका पाऊस आला कि धबधबा ओसंडुन वाहु लागला .. त्यावेळीच नाही तर अनेकदा मी असे अनुभव घेतले आहेत.. त्यावेळी पृथ्वीवर मी आणि माझ्या मित्रांनी स्वर्ग अनुभवला..
माझा भगवंतावर आणि त्याच्या लिलांवर प्रचंड विश्वास आहे आणि त्याची प्रचिती तो योग्य वेळी देतो..

निसर्गात गेल्यावर प्लॅस्टीक न टाकणे असेल.. काचेच्या बाटल्या न फोडणे असेल.. कुठल्याही वाईट गोष्टी आपल्या हातुन घडणार नाहीत याची काळजी घेणं असेल.दरवर्षी झाडे लावणे असेल. सेल्फीच्या नादात अतिरेक न करणं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण त्याच्याकडे गेलो की तो भरभरुन सुख देतो… मी खुप भटकते आणि वेगवेगळ्या मंडळीसोबत असते..

अनेक गोष्टी शिकायला मिळतात.. नवीन स्पॉट कळतात.. अनेक नवीन ओळखी होतात.. नवीन मित्र होतात.. रुसतात , भांडतात पुन्हा एकत्र येतात..
पुण्याच्या आसपास तास दोन तासावर अनेक सुंदर स्पॉट आहेत .. जेव्हा जमेल तेव्हा आवर्जून जात रहा .. पावसाळ्यात धबधबे .. थंडीत येणारा शहारा , उन्हाळ्यात येणारा सुकामेवा किवा गुलमोहर , निलमोहर ,बहावा , शेवरीचा कापूस कुठल्याही सुखाला पाठ फिरवु नका..
जगताना भरभरुन जगा आणि तसच समोरच्याला जगूही द्या..

सोनल गोडबोले
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *