मी कायमच अनेक पुरूष मित्रात असते त्यामुळे पुरुषांची नस नस ओळखते.. पुरूष पण जेलस असतात बरं , तेही रुसतात .. प्रमाण कमी असावं… माझे अनेक मित्र असेही आहेत जे एक एक वर्षे नाराज हौवुन गायब असतात .. सगळीकडे फिरुन येतात आणि तेव्हा त्यांना वैचारिक लेव्हल म्हणजे काय ते कळतं , तेव्हा त्यांना उच्च विचारी काय ते समजतं आणि तेव्हाच त्यांना खरी आणि प्रामाणिक सोनलही लक्षात येते आणि गाव फिरुन झालं की माझ्याकडे परत येतात.. मी त्यांच्यामागे त्यांना वाईट म्हणत नाही.. त्यांचा राग करत नाही कारण माझ्यासोबत असताना अनेक गोष्टी त्यांनी मला दिलेल्या असतात मग अचानक असं काय होतं ??खरं तर माझ्याकडून मी क्रीस्टल क्लीअर असते पण त्यांचा पुरुषी अहंकार आडवा येतो आणि बिनसतं तसच पुन्हा जुळतही..
मैत्री ही अशीच असते.. माझ्या आयुष्यातुन बाहेर गेलेल्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणण्याची ताकद माझ्या प्रामाणिकपणात आहे त्यामुळेच असाच एक मित्र दिढ वर्षाने दोन दिवसापूर्वी माझ्याकडे आला..
मी गेस्ट म्हणुन एका कार्यक्रमाला गेले होते तिथे तोही गेस्ट होता..जेव्हा त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी मागे वळुन पाहिलं तर तोच होता.. अतिशय देखणा , हुशार पीएचडी होल्डर .. पण मी माझ्या कामात राहिले फार ओळख दिली नाही.. त्यानंतर माझं नाव घेउन मला स्टेजवर बोलावण्यात आलं त्यावेळी त्याने मला पाहिलं .. मी पाहुन न पाहिल्यासारखं केलं..
स्टेजवरुन खाली आल्यावर खुप आशेने तो माझ्याकडे पहात होता पण मला तिथून लगेच निघायचं होतं म्हणुन मी बाहेर पडले आणि तिथेच काही स्टॉलवर चक्कर मारावी म्हणुन गेले.. पहिलाच स्टॉल ज्वेलरीचा होता..काही नेकपीसेस तर अतिशय आकर्षक होते.. त्यातल्या एका नेकपीसने माझं नाव त्यावर कोरलं होतं पण ते मनातच तिथे काहीही न घेता मी पुढच्या स्टॉलवर गेले.. तिथे इअररिंग पहात असताना मागुन आधीच्या स्टॉलवरील लेडीचा आवाज आला .. Mam this is for you..असं म्हणत मला आवडलेला नेकपीस हातात ठेवला .. मी म्हटलं , मी पे नाही केलं , त्यामुळे मला नकोय.. मागुन आवाज आला माझ्याकडून गिफ्ट .. मागे वळुन पहाते तर तोच माझा मित्र ज्याने मनवायला किवा प्रेमाने म्हणु तो मला गिफ्ट केला होता.. मी त्याला म्हटलं , इतक्या दिवसांत तुला माझी आठवण आली नाही का ??.. आणि तु माझ्या आयुष्यात परत का आलास ??.. गैरसमज करुन रागाने निघुन गेला होतास ना.. त्यावर तो गोड हसला आणि त्याचक्षणी माझा रागही गेला. जणु काही घडलच नाही अशा दिमाखात पाऊण तास गप्पा मारत कॉफी घेतली आणि पुन्हा मैत्रीसाठी सज्ज झालो.. मैत्रीही अशीच असावी ना.. रुसावं , फुगावं आणि पुन्हा एकमेकांना कवेत घ्यावं.. माझ्या प्रामाणिकपणाचे अनेक फायदे मी पाहिले आहेत त्यातला हा एक.. असाच एक बिल्डर मित्र तोही परत आला आणि अजुन एक कारण नसताना रुसलेला तोही परत येण्याच्या मार्गावर आहे..
मी नेहमी म्हणते ना प्रचंड मोठा मित्रपरिवार आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्वानी माझं आयुष्य समृद्ध आहे… त्यादिवशी ज्या कार्यक्रमाला मी गेले होते त्यानी मला दिलेलं सर्वात सुंदर मौल्यवान गिफ्ट.. तो नेकपीसही माझ्याच गळ्यासाठी बनला होता आणि हरवलेला मित्रही माझाच होता.. जो तिथे माझ्यासोबत असलेल्या मित्रांसमोर शाईनिंग मारत होता.. नौटंकी करत होता… ये पतली कमरवाली असं काहीबाही बरळत होता.. त्याचा आनंद हाच माझा आनंद होता आणि तोच आनंद कॉफीच्या मगातुन ओसंडुन वहात होता.. अगदी अमेरिकेतील नायगरा धबधब्यासारखा.
सोनल गोडबोले