कंधार : प्रतिनिधी
बाल चित्रकार रमाकांत जोंधळे यांच्या कलात्मक प्रतिभेचे शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार येथे कौतुक करण्यात आले .
मन्याड खोर्यात गुणी कलावंताची जणूकांही खाण आहे.म्हणतात ना “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!”या उक्ती प्रमाणे कंधार शहराच्या ईशान्य दिशेला जगतुंग सागराच्या साडवा प्रवाहाच्या कडेला कोटबाजार नगरीच्या अगदी जवळ असलेल्या अशोकनगर पाड्यात भीमराव जोंधळे व सौ.मनिषा भीमराव जोंधळे यांच्या उदरी जन्मास आलेला चिमुकला बाल चित्रकार रमाकांत भीमराव जोंधळे वर्ग मराठी नववी “क”श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात कलावंताचा सत्कार श्री शिवाजी हायस्कूलचे आदर्श मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर यांच्या समर्थ हस्ते मातोश्री मुक्ताई धोंडगे सांस्कृतिक कलामंडपात प्रार्थना झाल्यानंतर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बाल चित्रकार रमाकांत यांच्या कलात्मक प्रतिभेचे तोंड भरुन कौतुक करतांना मुख्याध्यापक साहेबांनी स्तूतीपूष्प उधळत त्यांने रेखाटलेल्या पेन्सिल स्केचचे विमोचन करत श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथील ग्रंथपाल हरहुन्नरी कलावंत,बाल चित्रकार रमाकांतचे मार्गदर्शक गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे रंगीत पेन्सिल हे माध्यम वापरुन सुंदर स्केच त्यांना भेट देणार होता.
गुरुजीचा ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी वाढदिवस होता त्या औचित्याने स्केच केलेला फोटो भेट देवून विद्यार्थी अनोखे अभिष्टचिंतन करणार होता.पण दीपावलीच्या सुट्ट्या मध्येच आल्याने ही भेट देता आली नाही.पण आज दि ११ डिसेंबर २०२३ रोजी ही भेट आपल्या गुरुजीस दिली.या प्रसंगी सर्व गुरुजनांनी आपल्याच हायस्कूल मध्ये शिकत आसलेला बाल चित्रकार रमाकांत जोंधळे यांच्यावर सर्वानी अभिनंदनाचा रतिब घातला.सर्वाची वाहवा मिळविली.या कार्यक्रमा प्रसंगी आदरणीय मुख्याध्यापक साहेब यांनी सत्कार केला.
या वेळी उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर, पर्यवेक्षक रमाकांत बडे सर, मराठी उच्च माध्यमिकचे उपप्राचार्य प्रा. संभाजी पा.वडजे मसलगेकर,उर्दू विभाग उपप्राचार्य प्रा.हिदायत बेग सर,सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्करराव आकुलवाड सर,प्रा.रहिनुसा बाजी,प्रा.मुरलीधरजी घोरबांड सर,प्रा.भगवानराव बामणे सर,प्रा.अशोकराव वरपडे सर,प्रा.विद्याताई फड मॅडम, प्रा.हासूळे सर,प्रा.जमील बेग सर, सौ.अंजली कानिंदे/मुनेश्वर मॅडम,वैभव कुरुडे सर,गोविंद आनकाडे सर,ज्ञानेश्वर कुरे सर,शेख ऐनोद्दीन सर,मैनोद्दीन सर,
सौ.सुमन चिंतेवार/बोडेवार मॅडम, सौ.रणभीडकर/फुके मॅडम,प्रकाश पवार सर,बालाजी झु॔जरवाड सर,शिवाजी पवार सर,मन्मथ पेठकर आदींसह विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
उत्कृष्ट सुत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख भास्करराव आकुलवाड सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे क्षणचित्र सेमी विज्ञान विभाग प्रमुख अझहर बेग सर यांनी मोबाईलने सुंदर टिपली आहेत.