मकर संक्रांती सणाला धार्मिक,भौगोलिक, वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्व आहे.
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.
संक्रांती’ म्हणजे ‘हस्तांतरण’, हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे.
मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, बायका व मुलीनीं घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भेटवस्तू देणे घेणे म्हणजेच वान उचलणं असे म्हणतात. पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठीच नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्याच ठिकाणी भव्य पतंगोत्सव देखील आयोजित केला जातो आणि स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. पण मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंग का उडविला जातो आणि त्यामागील कारण काय याचा विचार कधी केलाय का?
मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा केवळ धार्मिकच नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. तसे पाहिले गेले तर पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये पडल्याने शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. याव्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो.
भारतात मकर संक्रांतीच्या उत्सवाच्या निमित्ताने पतंग महोत्सव अनेक ठिकाणी आयोजित केला जातो. या कार्यक्रमांमध्ये आकाशात वेगवेगळ्या आकाराचे पतंग दिसतील, ते दृश्य मंत्रमुग्ध करणारे असेल.
पतंग उडवल्यामुळे मनाला नक्कीच आनंद मिळतो, परंतु काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण आनंदाचे दु: खामध्ये रूपांतर होण्यास अजिबात वेळ लागत नाही. पतंग उडवण्यासाठी सुरक्षित जागा निवडा आणि चीनी मांजाचा वापर करू नका. मांजाची धार धारदार करण्यासाठी बल्बचा भूसा आणि इत्यादींचा वापर केला जातो.
पतंग उडवताना खुप अपघात होतात.त्यामुळे स्वतःची आणि इतरांची काळजी घेत हा सण साजरा करावा.
रूचिरा बेटकर ,नांदेड.
9970774211