Happiness…( सुख )

….. एका मित्राने मला विचारलं , सोनल तु काय विकतेस ??..
खरं तर त्याचा प्रश्नच मला कळला नाही..
मी म्हटलं , आता आपण काहीतरी वेगळं बोलतोय ना मग यात विकण्याचा काय संबंध .. त्यावर तो म्हणाला , डावीकडे बघ माझा मित्र बसलाय तो पॉलीसी विकतोय .. पुढे तो म्हणाला , आजकाल प्रत्येकजण काहीना काही विकत असतो.
कोणी दुख विकतो हे ऐकुन मला जरा विचित्र वाटलं.. मी त्याला म्हटलं , दुख कसं काय कोण विकेल ??.. ती काय वस्तु आहे का विकायला ??.. त्यावर तो म्हणाला , सिगरेट , दारु ,गांजा विकणारे दुख विकतात म्हणजेच जो तो विकत घेइल त्याची लक्ष्मी तर जाणार आहेच पण यामुळे येणारे आजार घरातील शांती घालवतात किवा व्यसनान्मुळे घरात भांडणं होतात , बलात्कार होतात , मग यात सुख कुठेच नाही .
मी विचार करु लागले तसं पटुही लागलं..
आता सांग सोनल तु काय विकतेस ??.. बापरे हा माझ्यासाठी खुप मोठा प्रश्न होता.. त्याला म्हटलं , मी सुख , आनंद वाटते असं म्हणु का ??.. कारण अनेकांना अनेक गोष्टीतुन आनंद देण्याचा प्रयत्न करते.. ज्ञान देण्याचा प्रयत्न करते .. पुस्तकं विकते असं म्हणायला हरकत नाही पण त्यातून आनंद आणि ज्ञान देते ..
मग फुकट काय मिळतं ??.. असा पुन्हा नवा प्रश्न त्याने विचारला .. मी पुन्हा विचार करु लागले.. तसं पहायला गेले तर फुकट काहीही मिळत नाही… श्वास घ्यायला सुध्दा आधी श्वास सोडावा लागतो.. मग फुकट काय मिळत असेल बरं ??
किती अवघड प्रश्न आहे हा.. मला वाटतं , सुखच फुकट मिळत असावं कारण दुसरा कोणीही आपल्याला आनंदी सुखी ठेवु शकत नाही.. आपलं सुख फक्त आपल्या हातात असतं.. मग ते आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीत आणि हवं तसं.. जर ही गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे तर मग दुख का कवटाळायचं ना..
तुझा नवरा तुला सुखी ठेवतो का ?? .. असा प्रश्न नक्की काय कारणाने विचारला जातो माहीत नाही पण मीच मला आनंदी राहायला मदत करते हेच उत्तर असावं.. पण मग इतर माणसाची गरज लागत नाही का तर नक्कीच लागते पण ती सुखाच्या कारणांसाठी लागते त्यातून सुखी रहायचं की नाही हे फक्त आपल्याच हातात असतं..

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ??…
काय पुण्य असतं की जे घरबसल्या मिळतं. म्हणजेच याचा अर्थ घरबसल्या मिळणारं सुख वाटुयात.. अर्थात आनंद वाटु शकतो सुख नाही हाच या दोन शब्दात फरक असावा..हा लेख अर्धा एअरपोर्ट वर लिहीला आणि अर्धा विमानात कारण कृष्णा शर्मा नावाचा २८ वर्षांचा मुलगा माझ्या शेजारी विमानात बसला होता.. एक तास मी त्याच्यासोबत गप्पा मारत होते.. अनोळखी होता तरीही ओळखीचा वाटला.. प्रचंड पॉजीटीव्ह एनर्जी असलेला कृष्णा नावाचा गोड मुलगा.. बडबडा , देखणा मला आवडला.. प्रेमात पडले म्हणा तरीही चालेल.. प्रचंड आदर त्याच्या सहवासात मी आनंद घेतला .. एअरपोर्ट वरुन मी माझ्या घरी आले तोही त्याच्या घरी गेला असेल पण आनंद देउन…

Be happy forever.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *