नांदेड :
कर्म हीच पूजा आणि लोकसेवा हीच साधना….सत्य कर्माचा व्यासंग मनुष्याला सकर्मक बनवतो….आशा सत्कर्माची दखल नेहमीच घेतली जाते….ज्यामुळे कर्मफलश्रुतीचा आनंद मनुष्याला आणखीनच नवी उमेद प्रदान करतो…आशा महनीय व्यक्तिमत्वात साचेबद्ध असणारे …कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पाटील पांडागळे साहेबांचे अनुज श्री रामेश्वर पांडागळे सर,मुख्याधिकारी न.प.कळमेश्वर जि.नागपूर यांची महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेत सन-२०२३ अंतर्गत उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून ” नवभारत के शिल्पकार” या पुरस्कारासाठी निवड होऊन दि.१३ जानेवारी २०२४ रोजी मुंबई – ताज हॉटेल येथे राज्याचे विद्यमान राज्यपाल श्री.रमेश जी बैस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला..याबद्दल त्यांना सहृदय शुभेच्छा..!