गेले अनेक दिवस राममंदिर उद्घाटनाबाबत सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा वाचण्यात येत आहेत.. प्रत्येकाला काहीना काही व्यक्त व्हायची घाई आहे.. त्यासाठी लागणारा अभ्यास करायची तयारी एकाचीही नाही.. फक्त एकमेकांवर ताशेरे ओढणे याची जणु स्पर्धाच सुरु आहे.. देव राहिला बाजूला आणि शास्त्रही …
लिहीण्याआधी एक गोष्ट क्लीअर करु इच्छिते ती म्हणजे मी कुठल्याही पक्षाची नाही.. मी कृष्ण भक्त म्हणजेच राम भक्त नक्की आहे आणि मी माणूस आहे म्हणुन माणुसकीच्या नात्याने यावर काही लिहु इच्छिते.. राजकारण आणि जात धर्म यावर मी कधीही लिहीत नाही आणि लिहीणारही नाही कारण माझ्या लेखणीतुन चांगले विचार समाजाला द्यायचे आहे त्यामुळे माझ्या वाचकांनी अभ्यास करुन कुठल्याही गोष्टीवर व्यक्त व्हावं… नाहीतर हरे कृष्ण हा महामंत्र सतत गुणगुणत रहावा कारण यातुन आपल्याला फायदाच होणार आहे..
सोशल मिडीयावर सुरु असलेला विषय असा आहे की पौष महिन्यात कुठलाही धार्मिक विधी करु नये मग राम मंदिर उद्घाटन का केलं जातय ??.. हा प्रश्न मी आमच्या भगव्द्गीता गृपवर विचारला त्यावर माताजीनी दिलेलं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे.. ” मार्गशीर्ष संपूर्ण महिन्यात भगवंताची उपासना करा असं शास्त्रात सांगितले आहे मग आपण ते करतो का ??.. याचं उत्तर नाही असच येइल मग पौष महिन्यात अमुक एक करु नये असं सागितले असेल तर ते का पाळतो ??.. दोन्ही प्रश्न माझ्या वाचकांनी काळजीपूर्वक वाचावेत आणि स्वतः उत्तर शोधावं.. खरं उत्तर सापडेल..
म्हणजेच काय तर चांगले आपल्याला कोणालाच घ्यायचे नाही आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्यावर फोकस करुन समाजात नकारात्मकता पसरावायची..
भगवंताचीच पुजा होणार आहे मग त्याच्यासाठी तर सगळे दिवस सारखेच.. यात राजकारण्यानी राजकारण करु नये आणि आपल्यासारख्या इतरांनी त्यावर ताशेरे उडवु नयेत.. आपण तटस्थ राहुन त्यादिवशी भगवंताचे दिवसभर नामस्मरण करावे आणि आपल्या पुण्याचं पारडं जास्तीत जास्त जड करुन घ्यावं बाकी कोण काय राजकारण करत आहे हे पहायला स्वतः श्रीकृष्ण आहेच.. ते आपले काम नाही.. कर्मानुसार प्रत्येकाला त्याचं फळ मिळणार आहे.. त्यामुळे आपण आपला मौल्यवान वेळ चांगल्या गोष्टी साठी आणि सेवा , भक्तीसाठी लावावा..
कुठलीही जात धर्म भगवंताने निर्माण केली नाही त्याने ४ वर्णात विभाजन केलय त्यामुळे शास्त्राचा अभ्यास करुन आपण माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी वागणार आहोत..
भगवद्गीता भगवंताने सांगितली नाही हे म्हणणारे लोकही या समाजात आहेत आणि शास्त्र लोकांनी लिहीलय म्हणणारे लोकही आहेत पण मुळात ज्ञान कोणी दिलं यावर विचारच होत नाही.. ब्रह्माजीनी सृष्टीची निर्मिती केली आपण म्हणतो पण ब्रह्माजीना ज्ञान भगवंताने दिले हे जाणुन घेत नाही.. आधी कृष्ण की आधी विष्णु या चक्रात अडकलेल्याना हे माहीत हवं की विष्णु हे कृष्णाचा अवतार आहे.. म्हणजेच भगवान कोण याचं उत्तर सरळ आहे.. कोणीतरी सांगितले म्हणुन डोळे झाकुन फॉलो करु नका.. श्रीमद्भागवत आणि भगवद्गीता जरुर वाचा .. जे सत्य आहे ते स्विकारायची आपली तयारी हवी कारण ते सोनल सांगत नाही तर शास्त्र सांगत आहे..
हरे कृष्ण.. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम
ऱाम राम हरे हरे..
कलियुगात नामस्मरण आपल्याला तारु शकतं इतर काहीही नाही.. ( तळटिप.. ज्यांच्यामुळे हे घडतय त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करुयात आणि त्यातून एक पॉजीटीव्ह विचार असा करु की त्यांच्यामुळे दिवसभर आपल्याला नामस्मरणाची संधी मिळणार आहे..ती आपण वाया घालवु द्यायची नाही.. Always be positive..
सोनल गोडबोले
.