भक्ती वयाच्या कधीपासून सुरु करावी ??..

 

हा प्रश्न जर प्रत्येकाला विचारला गेला तर जवळपास प्रत्येकजण म्हणेल म्हातारपणात किवा ६०/७० री नंतर..
कारण भक्ती ला दुय्यम स्थान देउन आपण सगळेच इंद्रियभोगाच्या मागे लागलो आहोत.. आपल्याला मिळालेला जन्म हा खाण्यापिण्यासाठी किवा एंजॉय करण्यासाठी झालाय असच आपल्याला वाटतं.. या असं वाटण्यात चुक आपली नाही तर आपण अनेक पिढ्यांपासून हे ऐकत आलोय आणि तेच फॉलो करत आलोय.. काल मी माझ्या मित्राला नैवेद्याचं महत्व समजावुन सांगत होते तर त्याचं लक्ष भौतिक गोष्टीत होतं म्हणजेच काय मोह , माया यातुन आपण बाहेर पडत नाही .. सतत पैसा , प्रॉपर्टी , पार्ट्या यातच जीव अडकलेला असताना आपण म्हातारपणीही भगवंताचे नाव घेउ असं म्हणतो पण ते तेव्हाही घेतले जात नाही याचं उत्तम उदाहरण माझ्या समोर घडत असलेलं तुम्हाला सांगते.. मग तूम्हीच ठारवा भक्ती वयाच्या कुठल्या वर्षांपासून करायची …
माझ्या अपार्टमेंटच्या समोर एक ९० वर्षांच्या आजी रहातात.. अजूनही त्यांना व्यवस्थित ऐकु येतं.. त्या नीट पाहु शकतात.. भरपुर खायची आजही आवड आहे.. आजही ही भाजी नको , ती हवी हा हट्ट असतो.. दिवसभर त्या बेडवर झोपुन असतात म्हणुन त्यांची सुन आणि आमची भगवद्गीता शिकवणारी टिचर दोघी त्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांनी रामाचा फोटो दाखवला आणि विचारलं हे कोण आहेत त्यावर त्यांनी उत्तर दिलं आंबा ..मग या दोघी म्हणाल्या , राम म्हणा तर म्हणाल्या , आज कोबीची भाजी नको जरा काहीतरी चमचमीत कर .. त्यांनी हातात माळ दिली आणि म्हणाल्या एकदा राम म्हणा ना तर , =त्यावर त्यांच्या नातवाचं नाव घेउन म्हणाल्या ,मुलीचा फोटो दाखव की बघु नात सुन कशी दिसते.. हा कसला फोटो दाखवतेस म्हणजेच काय तर वयाच्या ९० व्या वर्षी सुध्दा त्यांना कुठलीही गोष्ट सोडता येत नाही आणि भक्ती करण्याची इच्छा होत नाही.. रामाचं नाव घ्यायची याही वयात त्यांची तयारी नाही.. आपला जीव कृत्रिम गोष्टीत अडकतो पण नामस्मरणात नाही..

बऱ्याचदा ठरवुनही उतार वयात आपण भक्तीला लागु शकत नाही त्याची कारणे तब्बेत साथ देत नाही किवा मोह सुटत नाही हेही असतात.. मग जे सगळ्यात महत्वाचं आहे किवा जे सोबत जाणार आहे ते कधीही होत नाही आणि जे सोबत नेणार नाही त्यातच आपण आपला जीव अडकवतो..भक्तीसाठी सगळं सोडायचं हा खुप मोठा गैरसमज आहे .. सगळं करूनच भक्ती करायची आहे मग ती लहानपणापासूनच का करु नये.. भगवंताचे नाव आपण कुठेही कुठल्याही परिस्थितीत घेउ शकतो त्याचसोबत शिक्षण , संसार सगळं करु शकतो.. जसा भरपुर पैसा असुन परदेशवारी घडेलच असं नाही तसच म्हातारपणी भगवंताचे नाव ठरवुन सुध्दा घेता येइलच असं नाही..
हरे कृष्ण..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *